मुंबई : कमला मिल अग्नितांडव प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या दोघांमध्ये वन अबव्ह रेस्टो पबच्या मॅनेजर्सचा समावेश आहे. 


दोन मॅनेजर्सना ही अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केवीन बाबा आणि लोप्स या दोन मॅनेजर्सना ही अटक करण्यात आली आहे. 


अनधिकृत बांधकाम देखील जमीनदोस्त


कमला मिल परिसरात मोजो रेस्ट्रो आणि वन अबव्ह या रेस्टो पबला लागलेल्या आगीत 14 जणांचा बळी गेला होता. यानंतर मुंबई महापालिकेने येथील अनधिकृत बांधकाम देखील जमीनदोस्त करण्यास सुरूवात केली आहे.


एवढे दिवस अभय का?


मात्र एवढे दिवस महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांनी यांना अभय का दिलं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे.