कामोठ्यात अवैध फेरीवाल्यांचा बाजार उठला
कामोठे पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर बसलेल्या फेरीवाल्यांवर सिडको आणि पनवेल मनपाने कारवाई केली.
मुंबई : कामोठे पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर बसलेल्या फेरीवाल्यांवर सिडको आणि पनवेल मनपाने कारवाई केली.
राजकीय वरदहस्तामुळे या अनधिकृत मार्केटवर कारवाई केली जात नव्हती. पण सिडको आणि पनवेल मनपाने या अवैध फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारला. गेल्या अनेक वर्षांपासून या मोकळ्या भूखंडावर फेरीवाल्यांनी कब्जा केला होता.
कोणतीही परवानगी नसताना थेट मार्केटचं स्थापण्यात आलं होतं. अनेकवेळा नोटीसाही देण्यात आल्या होत्या. मात्र फेरीवाले जागा रिकामी करत नव्हते. कारवाईत 100 पेक्षा अधिक फेरीवाल्यांना हटवण्यात आलं.