मुंबई : अभिनेत्री कंगना आणि शिवसेनेतील वाद अजूनही कमी होताना दिसत नाहीये. काल कंगनाने राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर आज पुन्हा एकदा शिवसेनेने तिच्या या भेटीवर आणि कंगनावर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत कंगनावर टीका केली. कंगनाला जर मुंबई पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. आपलं बस्तानं त्यांनी उचलावं हेच योग्य ठरेल. अशी टीका अनिल परब यांनी केली आहे.


राज्यपाल भेटीवर टीका 


अनिल परब यांनी पुढे म्हटलं की, 'बेकादेशीर काम करणा-यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता ? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ का ?. मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचं नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही.'


स्प्लिस्ट पर्सनॅलिटी 


कंगनाची पर्सनॅलिटी स्प्लिस्ट पर्सनॅलिटी आहे. तिला डॉक्टरांची गरज आहे. हवंतर सेना डॉक्टरांची कुमक पाठवेल. अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या. कंगना अॅक्टर आहे, तिला जे स्क्रिप्ट दिलं जातंय, त्यानुसार ती बोलतेय अशी टीका देखील अनिल परब यांनी केली आहे.