आता कांजूरच्या जागेवर या कुटुंबाचा दावा, ही जागा मेट्रोसाठी नाही तर घरांसाठी !
Mumbai - Kanjur land : मेट्रो कारशेडसाठी (Kanjur Metro Car Shed) प्रस्तावित केलेल्या कांजूर जागेबाबत आता नवी माहिती पुढे आली आहे.
मुंबई : Mumbai - Kanjur land : मेट्रो कारशेडसाठी (Kanjur Metro Car Shed) प्रस्तावित केलेल्या कांजूर जागेबाबत आता नवी माहिती पुढे आली आहे. परवडणाऱ्या घरांसाठी ही जागा आहे. 500 एकर जागा मेट्रोसाठी (Kanjur Metro Car Shed) नाही, असा दावा एका कुटुंबाने केला आहे. याबाबत गरोडिया कुटुंबीयांनी राज्य सरकारला माहिती दिली आहे. ( Kanjur land is for affordable housing, not Metro : Lease-holder to Maharashtra govt.)
राज्य सरकारने मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित केलेल्या कांजूरच्या जागेवर गरोडिया कुटुंबाने आपला दावा सांगितला आहे. ही जागा मेट्रोसाठी नाही तर परवडणाऱ्या घरांसाठी आपण लीसवर घेतल्याचा त्यांचा दावा करताना स्टेक होल्डर गरोडिया यांनी मेट्रो कारशेडला कडाडून विरोध आहे.
राज्य सरकारला सादर केलेल्या माहितीत त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. शापूरजी पालनजी कंपनीसोबत इथे परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प उभारणार असल्याचे त्यांनी सरकारला सांगितले आहे. केंद्र सरकारची खार जमीन लीजवर घेतल्याचा त्यांचा दावा आहे. इथे मेट्रो कारशेड उभारण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे.
आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली होती. कांजूरमार्ग कारशेडला भाजपने तीव्र विरोध केला आहे. आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी भाजप आग्रही आहे. मात्र, कांजूर येथील जागेवर केंद्र सरकाने दावा केला आहे. त्याचवेळी राज्य सरकारने ही जमीन आमच्या मालकीची असल्याचे म्हटले आहे. आता हा वाद न्यायालयात गेला आहे. त्याचवेळी कांजूर येथील जमिनीवर गरोडिया कुटुंबाने दावा केला आहे.