Sanjay Raut : नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. यानंतर ईडी अधिकारी संजय राऊत यांना घेऊन ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आता राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी ट्विट करत याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


"बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय! ना डर,ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवाची भीक मागितली...तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी...! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत?," असे केदार दिघे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.



ईडीच्या अधिकाऱ्यांनी रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांची आज सकाळी 7.30 वाजल्यापासून त्यांच्या भांडूपमधल्या घरी चौकशी सुरु होती.