मुंबई मेट्रो - ३चे रात्री काम बंद ठेवा - मुंबई उच्च न्यायालय
शहरात सुरु असलेल्या मेट्रो तीनच्या रात्रीच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदीचे आदेश दिले आहेत.
मुंबई : शहरात सुरु असलेल्या मेट्रो तीनच्या रात्रीच्या कामावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदीचे आदेश दिले आहेत.
रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत हे कां बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेत. रात्रीच्या कामामुळे परिसरातल्या नागरिकांना त्रास होतो. यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती.
कफ परेडच्या रॉबीन जयसिंघानी यांनी या त्रासाबाबत याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.