मुंबई : खलिस्तानी दहशतवादी (Khalistan Terrorist) हरविंदर रिंडाचे हस्तक महाराष्ट्रात (Maharashtra) स्लीपर सेल म्हणून काम करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी मुंबई, नांदेड आणि मनमाडमध्ये ह्या स्लीपर सेल सक्रिय आहेत. याबाबत महाराष्ट्र पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या स्लीपर सेल अॅक्टिव्ह करण्याची कट कारस्थानं रिंडा पाकिस्तानातून करत असल्याचंही आता समोर येतंय. त्यामुळे देशावर आणि राज्यावर खलिस्तानी दहशतवाद्यांचं संकट अधिक गडद झालंय. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च महिन्यात हरविंदर रिंडाचे चार-पाच हस्तक नांदेडला येऊन आरडिक्स पोहचवून गेले आहेत. 


कर्नालमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महाराष्ट्र पोलिसांना ही माहिती मिळल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड ते पंजाबदरम्यानच्या अनेक भागांमध्ये खिलस्तानवाद्यांचं स्लीपर सेल आहे. या माध्यमातून युवकांना खलिस्तानी अजेंड्यासाठी तयार करत असल्याची माहिती समोर आली आहे. 


कोण आहे हरविंदर सिंह रिंडा?
मुळचा पंजाबमधल्या तरनतारण इथला असलेल्या हरविंदसिंह महाराष्ट्रातल्या नांदेडमध्ये स्थानिय झाला होता. 2014 मध्ये त्याने पटिलाया सेंट्रल जेलमधल्या एका अधिकाऱ्यावर हल्ला केला होता, तर 2016 मध्ये चंदिगडमध्ये एका विद्यार्थी नेत्यावर त्याने गोळाबार केला होता. सध्या तो पाकिस्तानमध्ये लपल्याची माहिती असून तिथून तो भारतात खलिस्तानी चळवळीला बळ देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.