मुंबई : भांडुपच्या सोनापूर परिसरातून अकरा वर्षीय कुलसुम शेख या लहान मुलीचं अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. आता या मुलीचा मृतदेह विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ पोलिसांना सापडला. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडुप पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु आता तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे.