Essel World मध्ये मनोरंजनाचा धमाका, Bird Park आणि Tic Tac Tot मुळे चिमुकल्याची धमालमस्ती
एस्सेल वर्ल्डमध्ये मनोरंजनाचा नवा धमाका, Tic Tac Tot ला चिमुकल्यांची पसंती
मुंबई : एस्सेल वर्ल्ड (Essel World) लहानग्यांसाठी मनोरंजनाच नवं साधन बनत चालला आहे. कारण लहान मुलांच्या मनोरंजनासाठी एस्सेल वर्ल्ड नवनवीन पार्क उभारत असते. अशाच आता बर्ड पार्क (Bird Park) आणि टिक टॅक टॉटमुळे (Tic Tac Tot) लहानग्यांचे तुफान मनोरंजन होत आहे. त्यामुळे या दोन्हीही पार्कमध्ये विकेंडला चिमुकल्यांची मोठी गर्दी जमतेय. या पार्कमध्ये चिमुकल्यांची नेमकी गर्दी का होतेय? काय खास गोष्ट आहे, या पार्कमध्ये जाणून घेऊयात.
एस्सेल वर्ल्डच्या (Essel World) बर्ड पार्क (Bird Park) आणि टिक टॅक टॉटमध्ये (Tic Tac Tot) प्रत्येक विकेंडला चिमुकल्यांची मोठी गर्दी होतेय. या पार्कमध्ये चिमुकल्यांच मनोरंजन होण्यासारख सुखद वातावरण आहे. लहान मुल रमतील इतकं सुंदर पार्क बनवण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक चिमुकल्यांच्या कुटूंबियांची पावलं या पार्ककडे वळली आहेत.
बर्ड पार्कची खासियत काय?
एस्सेल वर्ल्डचे (Essel World) बर्ड पार्क 2 (Bird Park) एकर पेक्षा जास्त जागेवर पसरले आहे. बर्ड पार्क (EsselWorld Bird Park) हे प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञांनी विकसित केलेले भारतातील पहिले विदेशी पक्षी उद्यान आहे. या उद्यानात देशातीलचं नव्हे तर विदेशातील पक्ष्यांना राहता येईल असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले आहे.
बर्ड पार्कमध्ये (Bird Park) तब्बल 500 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, यासोबत जगभरातील 50 पक्षी पार्कमध्ये आहेत. Blue Gold Macaw,African Gray Parrot, Cockatiel, Rainbow Lori, Sun Conure, Golden Pheasant, Ostrich, Black Swan and Carolina Wood Duck असे विविध प्रजातीचे पक्षी या पार्कमध्ये पाहता येणार आहेत.
या बर्ड पार्कला (Bird Park) भेट देऊन चिमुकल्यांना विविध प्रजातीचे पक्षी पाहता येणार आहेत. त्यासोबतच पक्षीप्रेमींना पक्ष्यांचा किलबिलाट आणि रंगबेरंगी पक्षी अनुभवता येणार आहेत.
टिक टॅक टॉट (Tic Tac Tot) काय आहे?
टिक टॅक टॉट (Tic Tac Tot) हे लहानग्यांसाठी मनोरंजनाचे नवीन साधन बनत चालंल आहे. या पार्कमध्ये चिमुकल्यांना गेमिंग आणि विविध मनोरंजनात्मक खेळाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या संपुर्ण परीसरात एसीची कुलिंग असणार आहे. त्यामुळे गारगार वातावरणात चिमुकल्यांना खेळाचा आनंद लुटता येणार आहे.
'हे' गेम्स खेळता येणार?
या पार्कमध्ये चिमुकल्यांना Ball Pool, Sandpit, Trampoline, Ninja, VR Games, Role Plays, Wall Games, Selfie Corners असे विविध गेम खेळता येणार आहेत. या पार्कची विशेषता म्हणजे चिमुकल्यांच आरोग्य लक्षात घेत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आलं आहे. यासाठी संपुर्ण परीसर मशिनने सॅनिटायझेशन होत आहे. यामुळे Tic Tac Tot हे मुंबईतील पहिलं मुलांच खेळाचं असं पार्क आहे जे सॅनिटायझेशन मशिनने नियमितपणे स्वच्छ होत आहे. त्यामुळे चिमुकल्यांच्या आरोग्याचीही काळजी मिटणार आहे.
थीमॅटिक रेस्टॉरंट
एस्सेल वर्ल्डच्या (Essel World) या पार्कमध्ये खेळून खेळून जर चिमुकल्यांना भूक लागली तर, त्यावरही जालीम उपाय आहे. अशा चिमुकल्यांसाठी इन-हाऊस थीमॅटिक रेस्टॉरंट एक्वा कॅफे असणार आहे. या रेस्टॉरंटमध्ये चिमुकल्यांच्या जिभेचे चोचले पुरवणारे स्वादिष्ठ पदार्थ खाता येणार आहेत. त्यामुळे खेळता खेळता चिमुकल्यांच्या भुकेचा प्रश्न देखील मिटणार आहे.
सर्वंच पालकांसाठी हे पार्क आकर्षणाचा केंद्रबिूद ठरतय. कारण अनेक पालक त्यांच्या मुलांना घेऊय या पार्कना भेट देत आहेत. ज्यामुळे चिमुकल्यांचा विकेंड उत्साहात पार पडतोय. जर तुम्ही तुमच्या मुलाला अजूनही या पार्कमध्ये घेऊन गेला नसाल तस आताच घेऊन जा, आणि त्यांनाही या मनोरंजनाच्या पार्कमध्ये आनंद लुटू द्या.