मुंबई : किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या जखमी झाल्याचं कळतं आहे. सोमय्या राणा दाम्पत्याची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला पोहोचले होते. याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिक देखील पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले. सोमय्या यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमय्या पोलीस स्टेशनमधून निघाल्यानंतर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी बाटल्या, चपला आणि दगडफेक केली. त्यांच्या गाडीची काच यामुळे फुटली. ज्यामध्ये सोमय्या हे जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.



सोमय्या हे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. गाडीवर झालेल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी ते य़ा ठिकाणी पोहोचले आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार हे देखील बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत.


नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी आज अटक केली आहे. मुंबतील वातावरण गेल्या २ दिवसांपासून तापलं आहे. आज नवनीत राणा यांनी मातोश्रीवर जाणार नसल्याचं म्हटलं होतं. पण नंतर पोलिसांनी त्यांना घरातून ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


नवनीत राणा यांनी जामिन घेण्याच नकार दिला आहे. आपल्याला बेकायदेशीरपणे अटक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे.