मुंबई :  sanjay raut on kirit somaiya injured : एक माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रपती राजवट लावा म्हणतो, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवली. त्याचेवळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. (kirit somaiya injured : putting tomato sauce under his Chin says sanjay raut )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरीट सोमय्या यांनी मुंबईत झालेल्या कार हल्ल्याच्या मुद्द्यावर काल दिल्लीवारी केली. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन ठाकरे सरकारची तक्रार केली. यामुद्द्यावर संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील भाजप पक्षातील लोकं लोकशाही विषयी प्रवचने झोडतायेत ही आनंदाची गोष्ट आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, सगळ्या राज्यातील विरोधकांवर दबाव त्यामुळे ते नक्की कोणत्या हिटलरशाही विषयी बोलत आहेत, असा टोला त्यांनी भाजपला हाणला. 


माथेफिरु वेडा हनुवटीवर टोमॅटो सॉस लावून येतो आणि राष्ट्रपती राजवट लावा म्हणतो आशा मूर्खाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कालच्या बैठकीत मुख्यमंत्री यांची गरज नव्हती तो गृहखात्याचा विषय होता. विरोधकांना सारखी खाजवत बसायची सवय आहे. एक दिवस त्यांची चामडी फाटणार आहे, त्यांचा बुरखाच फाटणार आहे, असे संजय राऊत म्हणाले.



देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना  संजय राऊत म्हणाले, राज्यात लोकशाहीला पायदळी तुडवलं जात असल्याच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ज्या पक्षाचं नेतृत्त्व नरेंद्र मोदी करत आहेत अशा भाजपाच्या राज्यातील नेत्यांकडून लोकशाहीची प्रवचने झोडली जात असतील तर त्यांचं कौतुकच आहे. त्यांना जी लोकशाहीची उबळ आली आहे. ती उत्तर प्रदेशच्या बाबतीतही कायम असावी. मी कालही सांगितले उत्तर प्रदेशमध्ये तीन महिन्यात 17 हून अधिक बलात्काराची प्रकरणं घडली आहेत आणि हत्याही झाल्यात. त्यामुळे फडणवीसांनी याबाबतही मन मोकळं करावं आणि लोकशाहीवर बोलावे.


दरम्यान, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही किरीट सोमय्या यांच्याबाबत ट्विट करत खिल्ली उडवली आहे.