संजय राऊत ED च्या ताब्यात, किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया
संजय राऊत यांना ED ने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत काय म्हणाले पाहा
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं. यावेळी संजय राऊत यांच्या घराबाहेर कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. त्यांनी मोठ्याने घोषणाबाजी देखील सुरू केली आहे. संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं. त्या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संजय पांडे आणि संजय राऊत यांचं माफीया राज संपलं आहे. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं विकासाचं राज सुरू होणार आहे.
हे राजकीय सूडबुद्धीने संजय राऊत यांना अटक केली जात असल्याचं शिवसैनिकांनी मत व्यक्त केलं आहे. आता तब्बल 9.30 तासांनी ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे.
आज सकाळी सव्वासात वाजता ईडीचं पथक संजय राऊत यांच्या भांडुपच्या घरी दाखल झालं होतं. त्यांच्या या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 10-12 ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल होऊन चौकशी केली. त्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.