मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीचे वरिष्ठ अधिकारी असलेले जितेंद्र नवलानी याने १०० हून अधिक बिल्डर आणि डेव्हलपर्सना धमकावू पैसे लुबाडले असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) कोण आहेत? किरीट सोमय्या यांच्याशी नवलानीचा काय संबंध आहे असे सवाल उपस्थित केले आहेत. 


किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केल्यानतंर किरीट सोमय्या यांनीही तात्काळ पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत आरोप करत असलेल्या प्रकरणाशी माझा दमडीचा संबंध नाही, त्यांच्याकडे एकही कागदपत्र नाहीए. उलट मी अधिकृत कागदपत्रांशिवाय एकही आरोप केलेला नाही असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.


कोविड घोटाळ्यात संजय राऊतचे पार्टनर सुजीत पाटकर यात पूर्णपणे बुडाले आहेत, शिवाजी नगर जम्बो कोविड सेंटरचं काम संजय राऊतचे पार्टनर सुजीत पाटकरच्या कंपनीला दिलं. पण ती कंपनीच अस्तित्वात नाही. त्याला ब्लॅक लिस्टेड केलं, अजित पवार खोटं का बोलतात, त्यांनी कमिटी नेमली होती. त्या कमिटीने रिपोर्ट दिला, पुणे महापालिकेने रिपोर्ट दिला की ही बोगस कंपनी आहे. 


त्यानंतरही आदित्य ठाकरे यांनी चार सेंटरची कामं त्याला दिली. त्याचं उत्तर देण्याची शिवसेनेची हिम्मत नाही, म्हणून आता काहीही आरोप करत आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.


विषय माफियागिरी करणाऱ्या घोटाळेबाजांचा आहे. जे घोटाळा करतात ते कोविडच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जीवाशी खेळतायत. 


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले, याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिक दाखल झाली असून लवकर सुनावणी व्हावी यासाठी मी प्रयत्न करत आहे असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.