मुंबई : महाविकास आघाडीतील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबधित 7 ठिकाणी ईडीने आज छापेमारी केली. या प्रकरणी बोलताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोव्हेंबर 2021 मध्ये राज्य सरकारने मान्य केलं की मंत्री परब यांचा रेसॉर्ट बेकायदेशीर आहे. हे रेसॉर्ट पाडण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. अनिल परब यांना दिलेली मुदत संपली आहे. सरकारने या रेसॉर्टचं वीज पाणी बंद करायला हवं. असे सोमय्या यांनी म्हटले.


'सदानंद कदम हे अनिल कदम यांचे व्यवसायिक भागिदार आहेत. त्यांनी 5 कोटी 22 लाखांचा चेक दिला असे चार्टर्ड अकाउंटंट यांनी स्टेटमेंट दिलंय. 25 कोटींची प्रॉपर्टी माझी आहे. असं सांगतात परंतू ती दाखवता आलेली नाही. हा रेसॉर्ट बेनामी संपत्ती घोषित केली जाईल. असा मला विश्वास आहे. परब यांनी जे गुन्हे केले आहेत त्यामुळे त्यांना अटक व्हायलाच हवी'. अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.


'मंत्री हसन मुश्रीफ विरोधात 158 कोटी मनी laundering चौकशी सुरू आहे. श्रीधर पाटणकर म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परिवारातील व्यक्तीचे 13 फ्लॅट ईडी ने जप्त केलेत. बीएमसीचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विरोधात आज उद्या मध्ये  cheating fraud चा गुन्हा दाखल होऊ शकतो. यांच्यात कोणाचाही पुढचा नंबर असू शकतो, असा इशारा सोमय्या यांनी दिला.