मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर आता भाजप आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात येणार आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी भाजपनेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा सोशलमीडियावर सुरू आहे. 'महाराष्ट्र आता माफियामुक्त झाला आहे. लवकरच मुंबई महापालिकाही माफियामुक्त होणार. असं किरीट भाजपनेते किरीट  सोमय्या यांनी म्हटलंय. नवं सरकार आता मुंबई ठाणे परिसरातील मेट्रो काम वेगाने पूर्ण करेल' असे किरीट सोमय्यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने जल्लोष साजरा केला. आज भाजपच्या कोअर टीमची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्र प्रभारी सी.टी रवी मुंबईत येण्याची शक्यता. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटीलांसह भाजप नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापनेबाबत चर्चा होणार आहे. तर उद्याच फडणवीस शपथ घेण्याची शक्यता आहे. 


दरम्यान, भाजपनेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्वीट केले. त्यात त्यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्र "माफिया" मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार तसेच, महाराष्ट्रात नवीन सरकार येणार ... पुन्हा एकदा मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, भाईंदर, वसई, नवी मुंबई, पनवेल ........ मेट्रो रेल्वेचे काम पुन्हा जलद गतीने सुरू होईल.'