किशोरी पेडणेकर म्हणतात, `शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस सोबर माणूस`
एसआरएमध्ये गाळे लाटल्याच्या आरोपाप्रकरणी किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब (CM Eknath Shinde) सोबर माणूस आहेत, ते राजकीय दबाव आणणार नाहीत, असं वक्तव्य किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केलंय. पेडणेकरांवर एसआरएमध्ये (SRA) गाळा घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) केला होता. त्यानंतर पेडणेकरांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. तुम्हाला शिंदे गटातून दबावासाठी फोन येतात का, असा प्रश्न पेडणेकर यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी हे उत्तर दिलंय. तसंच शिंदे-फडणवीस महिलांवर राजकीय अत्याचार करणारे नाहीत, असंही पेडणेकरांनी म्हटलंय.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याशी भेट आपल्या संबंधित प्रकरणाविषयी नव्हती तर मुंबईतील मतदारसंघाबाबत चर्चेसाठी मी आणि काही पदाधिकारी गेले होतो असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आपण कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार हे, बिंदास चौकशी करा असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. एखाद्या महिलेची इतकी बदनामी करणं बरोबर नाही, मला जेव्हा पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावले जाईल तेव्हा मी हजार राहीन असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
किशोरी पेडणेकरांनी एसआरएमधील गाळे हडप केल्याचा आऱोप सोमय्यांनी केलाय...त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आलीय...पण, आज पेडणेकरांनी थेट आरोप केलेल्या एसआरए इमारतीत जाऊन गाळे धारकांशीच चर्चा केली...गाळे हडप केल्याचा आरोप खोटा असून, आपल्याला जेरीस आणण्याचा सोमय्यांचा प्रयत्न असल्याचं पेडणेकरांनी म्हटलंय.. गाळा हडप केल्याचं सिद्ध करा, गाळ्याची चावी देते असं आव्हानही पेडणेकरांनी सोमय्यांना दिलंय...पण, सोमय्या आरोपांवर ठाम आहेत...पेडणेकरांना हिशोब द्यावाच लागेल असं सोमय्यांनी म्हटलंय... तर मला आता या आरोपांचा तिटकारा आलाय, अशी प्रतिक्रिया पेडणेकरांनी दिलीय.