Kishor Pednekar : हाजिर हो! किशोरी पेडणेकरांना आणखी एक समन्स
SRA flats scam : बहुचर्चित`एसआरए` घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) आणखी एक समन्स देण्यात आला आहे.
Kishori Pednekar and Kirit Somaiya : बहुचर्चित'एसआरए' घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) आणखी एक समन्स देण्यात आला आहे. शुक्रवारी 28 ऑक्टोबरला पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना शनिवारी 29 ऑक्टोबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या. त्यानंतर दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी पुन्हा एकदा समन्स पाठवला आहे.
'कसंही करुन मला अडकवण्याचा हा प्रयत्न'
शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. शनिवारी चौकशीसाठी न जाण्याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितले. दादर पोलीस स्थानकात (Dadar Police Station) चौकशीला मी जाणार नाही,असं त्यांनी शनिवारच्या चौकशीबद्दल स्पष्ट केलं होतं. त्यामुळे सोमवारी 31 ऑक्टोबरला त्या चौकशीसाठी जाणार की नाही हे पाहवं लागेल. त्याशिवायहे दबावतंत्र असून मला कसंही करुनअडकवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. ( Kishori Pednekar SRA flats scam and Kirit Somaiya inquiry dadar police 31 October nmp)
SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशी
एसआरएमध्ये फ्लॅट देण्याच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीत जून महिन्यात दादार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती. SRA मधील घर स्वस्तात मिळवून देतो असं सांगून लोकांकडून पैसे उकळनाऱ्या तीन आरोपींना दादर पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तींनी पोलीस चौकशीमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं नाव घेतलं आहे. SRA घोटाळ्यातील आरोपीशी झालेल्या व्हाट्सपवरील संभाषणामुळे किशोरी पेडणेकर अडचणीत आल्या आहेत.