मुंबई : मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) मुदत आज संपतेय. मुंबई महापालिकेवर उद्यापासून प्रशास नेमण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही. मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक घेणं शक्य होणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मुंबई महापालिकेची मुदत संपत असून निवडणूक एप्रिल अखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासन नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार उद्यापासून महापालिकेवर प्रशासक नेमला जाईल.


त्याआधी आज महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी आज महापौर म्हणून आपलं शेवटचं भाषण केलं. मुंबईकर निश्चितच शिवसेनेसोबत आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं आहे. आघाडी सरकार म्हणून काम करत आहेत त्यामुळे लोकांच्या आशिर्वादाने मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकणारच असा विश्वास किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला.


उद्यापासून नवी इनिंग सुरु होणार, लोकांसाठी काम करत राहणार, माझी टर्म संपली पण पत संपलेली नाही. मुंबईकरांना अर्ध्यावर सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केली. 


जोपर्यंत दुसरा महापौर निवडून येत नाही तोपर्यंत मी काळजीवाहू महापौर म्हणून काम करणार, मी मुंबईला असंच सोडणार नाही मी काम करत राहणार, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 


ज्यांच्यावर धाडी पडणार होत्या ते भाजपमध्ये गेले, ते शुद्ध झाले, म्हणजे पर्याय असा आहे की एकतर आमच्या या किंवा ईडी, सीबीआयच्या धाडी घ्या. पण आम्ही सैनिक आहोत, आम्ही घाबरणार नाही, कायदा आणि कागदाची ही लढाई आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.