मुंबई : पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल लवकरच शंभरी पार करणार असं दिसतंय. दरम्यान आज पेट्रोलच्या दरात कालच्या तुलनेत कोणता बदल पहायला मिळाला नाही. मुंबईत आज पेट्रोलचा दर ९३ रूपये ४९ पैसे तर डिझेलचे दर ८३ रूपये ९९ पैसे आहेत.


दर जाणून घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आजचे पेट्रोल-डिझेलचे दर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून देखील जाणून घेऊ शकताय. SMSच्या माध्यमातून देखील तुम्हाला नेहमीचे दर कळू शकतात. इंडियन ऑईलचे ग्राहक RSP लिहून 9224992249 या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. 


बीपीसीएलचे ग्राहक RSP लिहून 9223112222 तर एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122  या नंबरच्या माध्यमातून पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेऊ शकतात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. सकाळी ६ वाजल्यापासून नवी दर लागू केले जातात.