`कोल्हापूरचे छत्रपती उदयनराजेंच्या पाठिशी` - संभाजीराजे
साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांना अटक होण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. उदयनराजे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
मात्र आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे उदयनराजे यांच्या समर्थनासाठी मैदानात उतरले आहेत. उदयनराजेंच्या प्रत्येक अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे त्यांच्या सोबत असल्याचे संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मात्र हे पेज संभाजीराजे यांचंच आहे का हे सांगता येणार नाही. पण एकंदरीत प्रोफाईल फोटो आणि मागील पोस्ट पाहता हे संभाजीराजे यांचं फेसबुक पेज असावं, अशी सोशल मीडियात चर्चा आहे.
संभाजीराजेंनी फेसबुक पोस्ट खालील प्रमाणे केली आहे...
“काल रात्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी माझी चर्चा झाली.ज्या अडचणीचा ते सामना करत आहेत त्या अडचणीत कोल्हापूर छत्रपती घराणे पुर्णपणे त्यांच्यासोबत आहे. कुठल्याही संकटाचा सामना कसा करायचा हे छत्रपती घराण्याला चांगल माहित आहे. संकट ही आम्हाला नवीन नाहीत.लवकरच ते यामधून बाहेर येतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.”