पूरस्थितीची मुंबईकरांना झळ, उद्या गोकूळचा दूध पुरवठा बंद
एनडीआरएफची आणखी एक तुकडी कोल्हापूरकडे रवाना
मुंबई : उद्या मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकुळच 76 हजार लिटर दूध संकलन घटलं. आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती दिली आहे.
एनडीआरएफची आणखी एक तुकडी कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. दुपारपर्यंत ही टीम कोल्हापुरात पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. काल कोल्हापुरात दोन टीम आल्या आहेत. वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास सांगितली आहे.
पुढील तीन ते चार तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे आहेत. दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हवामान खात्याचा इशारा देण्यात आल आहे. कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक भागात पुराचं पाणी, मुंबई- बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला आहे.