मुंबई : सध्या धुमसत असलेल्या कोरेगाव-भीमा  वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारीला रामदास आठवलेंच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बैठक आयोजित करण्यात आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद यशस्वी करुन दाखवल्यानंतर आता राजकारण तापू लागले आहे. त्यामुळे आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या बैठकीचे आयोजन केल्याचे बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांची ताकद वाढल्याची कुजबूज सुरु झालेय. त्यामुळे आठवले गटाने यावर विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे बोलले जात आहे.


आम्ही सुरूवातीपासून अत्याचारग्रस्तांच्या बाजूनं आहोत. त्यामुळं याचा फटका आमच्या पक्षाला बसणार नाही, असं आठवले गटाचे ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर यांनी सांगितले. त्यामुळे कुठेतरी आठवले गटाला प्रकाश आंबडेकर यांच्या ताकदीचा अंदाज आल्याने ही बैठक घेतल्याचे म्हटले जात आहे.
 
दरम्यान, मराष्ट्रातील हिंसाचारामागे अदृश्य हात असल्याचा शिवसेना खासदार संजय राऊतांनी दावा केलाय. तर जातीय हिंसेमुळे व्यथित, असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलेय. तर राष्ट्रवादीने राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय. कोरेगाव-भीमा प्रकरणी सरकारने पुरेशी काळजी घेतली नसल्याचा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत केलाय. त्यामुळे आता कोरेगाव-भीमा पडसादानंतर राजकीय पडसाद उमटत आहेत.