मुंबई : Korlai bungalow case : शिवसेना आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या जोरदार 'सामना' रंगला आहे. (Kirit Somaiya vs Sanjay Raut ) कोर्लईतील बंगले प्रकरणानंतर  किरीट सोमय्या vs शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. आज कोर्लईत सोमय्या पोहोचल्याने संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कोण हा किरीट सोमय्या ? छोड दो पागल आदमी है... यहावंहा  घुमता है ...वो जेल जानेका रास्ता ढुंड रहा है. जल्दही जनता उसकी धिंड निकालेगी, असे राऊत म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगले कुठे आहेत ते दाखवा. ते बंगले स्वप्नात येत आहेत. यावर वारंवार स्पष्टीकरण झाले आहे. त्या जमीनीवर एकही बंगला नाही. हा भुताटकीच्या प्रकार आहे. भाजप पक्षाच्या नेत्यांना भुताटकी झाली आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी प्राॅपर्टी आहेत म्हणून ते बोंबलत आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.


अन्वय नाईक जागेचे मूळ मालक होते. त्यांना आत्महत्या का करावी लागली? यावर भाजप नेते बोलत नाहीत. त्यांना त्रास देणाऱ्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ भाजप नेते उभे राहिले. भाजप लोकांच्या दबावामुळे अन्वयने आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे.



अन्वय नाईक हे मराठी उद्योजक होते त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नाही. किरीट सोमय्या यांनीही धमकी दिली होती की, अर्णबकडे पैसे मागायचे नाहीत म्हणून. ही माहिती माझ्याकडे नव्याने आली आहे. भाजप मराठी माणसाला संपवण्यासाठी प्रयत्न करतेय. अन्वय नाईक हे मराठी लहान उद्योजक होते. आर्किटेक्ट होते, त्यांना पैसे मिळाले नाही, असे संजय राऊत म्हणाले. 


किरीट सोमय्या काय नेल्सन मंडेला आहे का ? तो सगळ्यात मोठा चोर लफंगा डाकू आहे. त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल होणार तुम्ही बघा. हे बापलेक जेलमध्ये जाणार, असा पुुनरउच्चार राऊत यांनी केला.