मुंबई : आर्यन खान प्रकरणानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे फार चर्चेत आले आहेत. सध्या एनसीबीने वानखेडे यांना आर्यन खान प्रकरणाच्या तपासावरून काढून टाकलं आहे. तर दिवाळीच्या निमित्ताने समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने एक फोटो शेअर केलाय. याला क्रांतीने एक भावनिक पोस्टही लिहीली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांती रेडकरने दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पती समीर वानखेडे यांना औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये 'तू देशासाठी खूप जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती' असं म्हटलंय. समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांच्याकडून सतत हल्लाबोल सुरु असताना क्रांती रेडकर वानखेडेंची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


क्रांती तिच्या पोस्टमध्ये म्हणतेय, 'माझा प्रिय... माझ्या उर्जेचा आणि सकारात्मकतेचा स्त्रोत, तुझ्याकडून मला खूप काही शिकण्यासारखं आहे. तुझ्याकडे असणारी शांतता मला खूप काही शिकवून जाते. तुझा दृढनिश्चय तसंच तुझा प्रामाणिकपणा मला नेहमीच आश्चर्यात टाकतो. देशाप्रती तुझा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती आहे.'


"तुझ्या आपल्या लोकांसाठी किती सुंदर योजना आहेत हे फक्त मला माहीती आहे. मला तुझा दररोज अभिमान वाटत राहो." अशी भावनिक पोस्ट क्रांतीने शेअर केली आहे.


दरम्यान आर्यन खानप्रकरणासहित सहा प्रकरणांच्या चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. संजय सिंह हे या तपासकामाचे प्रमुख असतील. या प्रकरणात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता संजय सिंह यांच्याकडे देण्यात आली आहे. हा प्रशासकीय निर्णय असल्याचं NCB चे पश्चिम विभागीय उप महासंचालक मुथा अशोक जैन यांनी स्पष्ट केलंय.