मुंबई : कोणताही सण आला की मुंबईकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. याचाच प्रत्यय आला मुंबईच्या लाईफलाईन मध्ये. सकाळी उठा फटाफट आवरा त्यात ऑफीसमध्ये जाण्याची गडबड त्यानंतर पुन्हा घरी गेल्यावर तिचं रोजची कामं. पण आजचा दिवस महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. निमित्त होतं दसऱ्याचं. सुंदर नटून महिलांनी चक्क ट्रेनमध्ये ठेका धरला. महिलांच्या गरब्याचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रोजच्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळं म्हणून या महिलांनी गरब्याच्या गाण्यांवर ताल धरला. 'दसऱ्या'च्या मुहूर्तावर सगळ्यांना सुट्टी असते. त्यामुळे मुंबईच्या लाईफलाईनमध्ये आजचं मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.


एवढचं नाही तर रेल्वे प्रत्येक डब्याला एखादया नवरी प्रमाणे आज सजवण्यात आलं आहे. त्यामुळे चाकारमान्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे.