स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर (Navi Mumbai Kahrghar) सेक्टर 35 मध्ये भाजीविक्रेत्यांवर (Vegetable Vendors) एक महिला दादागिरी करत असल्याचा व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) वायरल होतोय. या व्हिडिओत ही महिला अश्विल शिवीगाळ करत भाजीच्या गाड्या उलटून टाकत भाज्यांचं मोठ्याप्रमाणावर नुकसान करत असल्याचं दिसत आहे. एका नागरिकाने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर या महिलेच्या मुजोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हाफिजा अर्शद खान असं दादागिरी करणाऱ्या या महिलेचं नाव असून हफ्ता वसुलीसाठी (Extortion) ही महिला फेरीवाल्यांवर दादागिरी करत असल्याची माहिती समोर येतेय. ही महिला प्लॅस्टिक पिशव्या विक्री करण्याचा व्यवसाय करते. कोणी विक्रेत्याने तिच्या पिशव्या घेतल्या नाही की ती शिवीगाळ करते तसंच भाजीचे नुकसान करते अशी माहितीही समोर आली आहे. 



यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात शिवीगाळ , नुकसान करणे तक्रार दाखल करण्यात आली असून याआधी देखील तिच्यावर अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहे. एवढ्या मोठ्या संख्येने तक्रारी आल्या नंतर देखील पोलीस ठोस कारवाई करत नसल्याने फेरीवाले त्रस्त झाले आहेत. ही महिला ओवे गावातली राहणारी असून, तिच्या वर पोलीस काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.