`लालबागचा राजा` च्या उत्पन्नात २ कोटींची घट
यंदा मंडळाचे उत्पन्न सुमारे दोन कोटी रुपयांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई : 'नवसाला पावणारा' अशी ख्याती असलेल्या 'लालबागच्या राजा' मंडळास गणेशोत्सव काळात मिळणाऱ्या उत्पन्नात यंदा घट झालेली पाहायला मिळत आहे. राजाच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याचांदीच्या भेटवस्तूंचा लिलाव शनिवारी करण्यात आला. त्यातून त्यांना ९८.४८ लाख रुपये मिळाल्याची माहीती समोर आली आहे. यावर्षी मंडळाला सात कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे यंदा मंडळाचे उत्पन्न सुमारे दोन कोटी रुपयांनी घटल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच चलनातून बाद झालेल्या ५०० ते एक हजार रुपयांच्या १.३० लाख रुपयांच्या जुन्या नोटा भेटवस्तूंमध्ये होत्या. पावसामुळे या उत्पन्नात घट झाल्याचे बोलले जात आहे.
असा झाला लिलाव
एक किलो वजनाच्या सोन्याच्या विविध वस्तूंचा ३१.३५ लाख रुपयांना लिलाव गणेशाच्या ५८७ ग्रॅम वजनाच्या मूर्तीसाठी १५.६० लाख रुपये
सोन्याच्या नेकलेससाठी भाविकांनी १.५ ते २.६ लाख दिले.
सुंदर नक्षीकाम केलेल्या तांब्याच्या तलवारीसाठी लिलावात ६० हजार रुपये मिळाले.