मुंबई : मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाची पहिली झलक (Lalbaugcha Raja 2022 First Look) आज पाहायला मिळणार आहे. कोरोनाच्या निर्बंधामुळे 2 वर्ष गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. पण यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. गणेश मंडळांमध्ये ही उत्साहाचं वातावरण आहे. बाजारपेठा सजल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागच्या राजाची शान मात्र वेगळी आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो लोकं रांग लावून दर्शन घेत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ओळख जगभरात आहे. आज लाल बागच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळणार आहे.


लालबागचा राजाची मूर्ती त्याच ठिकाणी साकारली जाते. त्यामुळे मिरवणूक नसली तरी राजाची पहिली झलक पाहण्यासाठी लोकं आतूर असतात.


लोकांना आता घरी बसल्या देखील लालबागच्या राजाचं दर्शन होणार आहे. (Live Streaming of Lalbaugcha Raja 2022)



लालबागचा राजा Youtube LIVE


https://www.youtube.com/user/LalbaugRaja/featured