महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे संकेत
आफताब-श्रद्धा (Shraddha Walker murder) प्रकरण ताज असतानाच महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा (Law against Love Jihad) करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. तसे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिलेत.
Law against Love Jihad : आफताब-श्रद्धा (Shraddha Walker murder) प्रकरण ताज असतानाच महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कायदा (Law against Love Jihad) करण्याच्या हालाचाली सुरू झाल्या आहेत. तसे स्पष्ट संकेत उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिलेत. लव्ह जिहाद विरोधी कायद्याबाबत पडताळणी सुरू असून इतर राज्यांच्या कायद्याबाबत अभ्यास सुरु असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय. विशेष म्हणजे आगामी हिवाळी अधिवेशनातच लव्ह जिहाद विरोधी विधेयक (Anti-Love Jihad Bill in Winter Session itself) आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यात लव्ह जिहादची प्रकरणं वाढत चालल्याचा सातत्याने आरोप करण्यात येतोय. अनेक जिल्ह्यांमध्ये हिंदू मुलींची फसवणूक होत असल्याचा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय.
सध्या उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहाद विरोधात कायदा असून त्यात काय तरतुदी आहेत ते पाहूयात...
यूपीच्या लव्ह जिहाद कायद्यात काय तरतूद?
लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर आणि कोणाशीही खोटं बोलून विवाह करणं गुन्हा
अशा प्रकारच्या विवाहाला साह्य करणं देखील कायद्यानुसार गुन्हा
लव्ह जिहाद कायद्यात दोषी आढळल्यास 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 2 लाखांपर्यंत दंड
पीडित मुलगी अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती, जमातीतली असेल तर 4 ते 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाखांचा दंड
कोणती संस्था-संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल तर 3 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद
लव्ह जिहाद म्हणजे फूस लावून हिंदू मुलिंना मुस्लीम मुलांनी प्रेमाच्या जाळ्यात ओढणं, लग्न करणं आणि त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकणं. तसंच उपभोग घेऊन त्यांना सोडून देणं. काही महिन्यांमध्ये लव्ह जिहादची अनेक प्रकरणं समोर आली. त्यानंतर लव्ह जिहादविरोधी कायद्या आणण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात कायदा कधी येणार याबबात उत्सुकता आहे.