मुंबई : भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेसाठी चार जणांचा आवश्यक मतांचा कोटा असताना पाचवा उमेदवार दिला आहे. भाजपने प्रसाद लाड यांना पाचवा उमेदवार म्हणून तर काँग्रेसने भाई जगताप यांना दुसरा उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका नजरेसमोर ठेवून भाजप व काँग्रेसने मुंबईतील उमेदवारांना महत्त्व दिले आहे. भाजपने प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना तर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोन्ही उमेदवार मुंबईतूनच दिले आहेत.


भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर काँग्रेसची ४४ मते असून २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला १० मतांची भासणार आहे.


गुप्त मतदानाची धास्ती


राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेसाठी खुले मतदान नसून आमदारांना गुप्त मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षाचा व्हिप असला तरी आमदारांना पक्ष प्रतोदाला मतदान दाखवावे लागत नाही. या गुप्त मतदानाची धास्ती सर्व पक्षाच्या उमेदवारांना आहे.


राज्यसभेत क्रॉस व्होटिंगची चिंता नसते. पण विधानपरिषदेत मात्र स्वपक्षाच्या आमदारांसह अपक्ष आणि लहान पक्षांच्या आमदारांच्या भूमिकेवर विश्वास ठेवणे कोणत्याही उमेदवाराला अडचणीचे ठरते.