टोल प्रश्नावर विधानसभेत विरोधकांसह सत्ताधारी आमदार आक्रमक
नोटाबंदीच्या काळाततल्या टोलच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
मुंबई : नोटाबंदीच्या काळाततल्या टोलच्या नुकसान भरपाईवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे.
२४ दिवसांसाठी १२४ कोटींची नुकसान भरपाई टोल कंत्राटदारांना दिली जात असेल तर हजार बाराशे कोटी रूपये वसूल करण्यासाठी १५ ते २० वर्षे कशी लागतात असा सवाल काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारला केलाय. त्यामुळं हा टोल घोटाळा असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केलाय.
तसेच टोलच्याच मुद्यावरून भाजप आमदार सरदार तारा सिंग यांनीही सरकारला घरचा आहेर दिलाय. टोल ऑपरेटरला १२४ कोटी रुपये देणं म्हणजे जनतेच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
मुंबईतले टोल हे जनतेसाठी डोकेदुखी ठरू लागली आहेत. हे टोलचे झोल मुख्यमंत्री बंद करून दाखवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.