एव्हीएममध्ये फेरफार होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाला पत्र - मिलिंद देवरा
एव्हीएममध्ये फेरफार होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याची मागणी, मिलिंद देवरा यांनी केली आहे.
मुंबई : एव्हीएम ( EVM) मशिनमध्ये फेरफार होण्याची भीत वर्तविण्यात आली असून एव्हीएममध्ये फेरफार होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याची मागणी, मुंबई शहर काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार मिलिंद देवरा यांनी केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्ट्रॉंग रूमबाहेर थांबण्याची परवानगी मिळावी, अशीही मागणी केली आहे.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर तीन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर जाऊन संजय निरुपम यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. दरम्यान, ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी काळजीपूर्वक घेण्याची मागणी मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. तसेच मिलिंद देवरा यांनी एक पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना देखील लिहिले आहे आहे.
मिलिंद देवरा यांचे पत्र
मिलिंद देवरा यांनी निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र
- पत्रात ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
- EVM मध्ये फेरफार होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेण्याची मागणी
- काँग्रेस कार्यकर्त्यांना स्ट्रॉंग रूम बाहेर थांबण्याची परवानगी मिळावी
- सुरक्षा रक्षणबरोबर कार्यकर्ते उपस्थित ठेवण्याची परवानगी मिळावी
- शक्य असल्यास देखरेखीसाठी स्ट्रॉंग रूम बाहेरील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा अधिकार द्यावा
- मिलिंद देवरा यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी
- मिलिंद देवरा यांनी एक पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना देखील लिहिलं आहे
- ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेची जबाबदारी काळजीपूर्वक घेण्याची मागणी
- मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर तीन लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे
- या मतमोजणी केंद्रावर जाऊन संजय निरुपम यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली
- पुढच्या दोन रात्री अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांनी खबरदारी घेतली पाहिजे
- संजय निरुपम यांनी केलं कार्यकर्त्यांना आवाहन