व्हिडिओ : सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
![व्हिडिओ : सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली व्हिडिओ : सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2018/06/25/294537-lifetgeg.jpeg?itok=0CcgPKyW)
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमधल्या रमाबाई नगर इथल्या शांतीसागर या खासगी पोलीस वसाहतीतल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळली. सातव्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. त्यात या लिफ्टमधले ४ जण जखमी झाले.
जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या इमारतीत सर्व पोलीस कर्मचारीच राहत असून, सोसायटीतर्फेच इमारतीची देखभाल होत आहे.