योगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकारही करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ?
उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.
मुंबई : उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये त्या शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे ज्यांचं नैसर्गिक कारणामुळे शेतमालाचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे. याबाबत कृषी आणि अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील चर्चा सुरु असल्याचं बोललं जातंय.
महाराष्ट्रातील फडणवीस सरकार योगी सरकार प्रमाणे कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतो. जर सरकारने हा निर्णय घेतला तर याचा फायदा राज्यातील ३१ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. आता सरकार हा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करते का हे पाहावं लागेल.