इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभावरून अनेक जण नाराज
इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या पायाभरणीचा समारंभ उद्या होणार आहे.
दीपक भातुसे, मुंबई : इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या पायाभरणीचा समारंभ उद्या होणार आहे. पण या समारंभावरून अनेक जण नाराज आहेत. या कार्यक्रमाला फक्त 16 जण आमंत्रित आहेत. कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे काही मंत्र्यांना तर उद्याच्या कार्यक्रमाची माहिती सुद्धा नाही. जे मंत्री उपस्थित असणार आहेत त्यांना आज संध्याकाळी या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे.
सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वात आधी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि शरद पवार यांनी या स्मारकाचा वारंवार आढावा घेतला होता. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या स्मारकाच्या महत्वाच्या कार्यक्रमाची माहिती नसल्याने यासबंधित अनेक जण नाराज असल्याची चर्चा आहे.
पायाभरणीच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, मुख्य सचिव, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव, स्थानिक आमदार सदा सरवणकर , दोन स्थानिक नगरसेविका आणि महापौर यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण मिळालेलं नाही.