मुंबई : आता टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत यासाठी शासन काळजी घेणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टोल नाक्यांवर असलेला पिवळा पट्टयाचा नियम कठोरपणे अंमलात आणला जाईल. यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक टोल नाक्यावर पाच जणांची नियुक्ती केली जाणार, असल्याची घोषण एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदमध्ये केली.


गिरकरांनी उपस्थित केला प्रश्न 


विधान परिषदमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला राज्यातील टोन नाक्यांवरच्या पिवळा पट्ट्याचा मुद्दा भाई गिरकर यांनी उपस्थित केला. विशेषतः मुंबईच्या टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित गिरकर यांनी मांडला. 


टोल नाक्याजवळ असलेल्या पिवळा पट्ट्याच्या बाहेर वाहने उभी असतील तर त्या वाहनांना टोलमधून सूट दिली जाते, नियमाने टोल घेता येत नाही. मात्र, या नियमाबद्दल लोकांना माहिती नसल्यानं टोल धारक वाहनांकडून पैसे वसूल करतात... तेव्हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळच्या टोल नाक्यांवर पिवळ्या पट्ट्याच्या नियमाची अंमलबजावणी केली जाईल, यासाछी एक दक्षता पथकही नेमले जाणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 


तसंच काही टोल नाक्यांवर टोल वसुली मुदत संपल्यानंतरही सुरु असल्याचा मुद्दा प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. तेव्हा याबाबात एक समिती नेमत महिनाभरात टोल नाक्याच्या वसुलीच्या सद्य स्थितीबाबात अहवाल देणार असल्याचं शिंदे यांनी जाहिर केलं.