Mumbai Results LIVE: शिवसेनेच्या विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवले

Sayali Patil Sat, 23 Nov 2024-11:25 pm,

Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: मुंबईवर सत्ता कोणाची, देशाच्या आर्थिक राजधानीत आवाज कुणाचा? तुल्यबळ लढतींवर सर्वांचं लक्ष...

Mumbai Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडलं आणि आता निकालाचा दिवसही उजाडला. यंदाच्या वर्षी मुंबईतील कैक मतदारसंघांमध्ये तुल्यबळ लढती पाहायला मिळत असून, काही नवखे उमेदवार पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात त्यांचं नशीब आजमावत आहेत. शहरातील वडाळा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यंदा निवडणुकीत विजयी ठरल्यास त्यांच्या नावे एका विक्रमाची नोंद केली जाणार आहे. हा विक्रम असेल सर्वाधिक वेळा आमदारकीचं शिवधनुष्य पेलण्याचा... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील विधानसभा मतदारसंघांमध्ये कोण बाजी मारतं आणि मुंबईवर कोणाची सत्ता राहते यासंदर्भातील सर्व अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा... 


Latest Updates

  • शिवसेना विजयी आमदारांना मुंबईतील बड्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.  जवळपास 61 आमदार यांना या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणावरून सत्तेची सूत्र हलणार आहेत. 

  • कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी 

    कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून एकनाथ शिंदे विजयी. 159060 मतं मिळवत केदार दिघे यांचा 120717 मतांनी पराभव करत त्यांनी हा दणदणीत विजय मिळवला. 

  • सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश

    रविवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश. उद्या सर्व आमदारांसोबत दुपारनंतर बैठक. मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होण्याची शक्यता. 

     

  • पराभवानंतर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया. निराशेचा सूर, खंत आणि... 
    पाहा... 

  • आमदार आशिष शेलार विजयी; मोठी बातमी 

    आताच्या क्षणाची मोठी बातमी. भाजपच्या वाट्याला मुंबईत आणखी एक विजय. आमदार आशिष शेलार यांचा विजय. तब्बल 19, 713 मताधिक्याने हॅट्रिक !!

  • नवी मुंबईत बेलापूर मतदारसंघात मंदा म्हात्रे विजयी 

    बेलापूर विधानसभा मतदार संघतून मंदा म्हात्रे 415 मतांनी विजयी. बेलापूरच्या मतदान केंद्रावर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार संदीप नाईक दाखल. संदीप नाईक यांनी मतमोजणीला आक्षेप नोंदवलेला आहे. पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे. 

  • लाडकी बहिण योजना ठरली गेमचेंजर... - अजित पवार 

    'राज्यातील जनतेनं विकासाकडे बघून महायुतीला दिलेल्या यशाबद्दल सर्वाचे मनापासून आभार मानतो', असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडत कार्यकर्त्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. मुंबईत पार पडलेल्या महायुतीच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही लोकसभेतील अपयश मान्य केलं आणि त्यातून बोध घेत पुढील वाटचाल केल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरल्याचं ते इथं म्हणाले. 

     

  • मालाड मतदारसंघातील निकाल समोर... 

    मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख 6600 मतांनी विजयी. 

     

  • शिवसेनाभवनाबाहेर शुकशुकाट; कार्यकर्त्यांमध्ये निराशा 

    विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव होत असताना मुंबईतील शिवसेनाभवनाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासून निकालांचे कल महायुतीच्या बाजूनं असल्याचं पाहायला मिळालं आणि अंतिम निकालही याच पारड्यात पडल्यामुळं मविआ, उद्धव ठाकरेंची शिवसेने बाजूला भयाण शांतता पाहायला मिळाली. 

  • वर्षा बंगल्यावर महायुतीची बैठक 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील अनेक नेते वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी हजर. हास्यविनोद, गप्पा, चर्चा आणि विश्षेषणाचं सत्र सुरू. 

     

  • वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरूण सरदेसाई विजयी

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाच्या वरूण सरदेसाई यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांचा त्यांनी पराभव केला. 

  • शिवडीचा गड चौधरींनी राखला 

    शिवडी मतदारसंघात मनसेच्या बाळा नांदगावकर यांचा पराभव करत अजय चौधरी यांनी विजय मिळवला आहे. 19 व्या फेरीअखरे अजय चौधरी यांना 74 हजार 890 मते मिळाली. बाळा नांदगावकर यांना 67 हजार 750 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार नाना आंबोले यांना 5925 मतं मिळाली. बाळा नांदगावकर यांचा 7 हजार 140 हजार मतांनी पराजय झाला. 

     

  • भांडुपमधून विजयी उमेदवाराचं नाव समोर 

    भांडुप मधून शिंदेंच्या शिवसेनेचे अशोक पाटील हे 7000.  मतांच्या फरकाने विजयी झाल्याची माहिती समोर. 

     

  • कुलाब्यातून राहुल नार्वेकर विजयी 

    मुंबईतील धनाढ्य मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या कुलाबा मतदारसंघातून भाजपच्या राहुल नार्वेकर विजयी झाले आहेत. तब्बल 48581 मतांनी त्यांनी हा विजय मिळवत काँग्रेसच्या हीरा नवाजी देवसी यांचा पराभव केला. 

  • भायखळ्यातून यामिनी यशवंत जाधव पराभूत

    भायखळ्यातून यामिनी यशवंत जाधव पराभूत. उद्धव ठाकरे गटातील मनोज जामसुतकर यांनी मारली बाजी. 

     

  • कल्याण पश्चिम मतदारसंघातून मोठी बातमी 

    कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे विजयी 

  • कल्याण पश्चिम मतदारसंघातून मोठी बातमी 

    कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे विजयी 

  • विजयी कामगिरीनंतर मुख्यमंत्र्यांची पहिली पोस्ट...

    'सर्व मतदारांचे मन:पूर्वक आभार : समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या आशीर्वादाचा, विचारधारेचा हा विजय आहे', असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलं. 

  • परत मतमोजणी करा- हितेंद्र ठाकूर 

    व्हीव्हीपॅटच्या स्लिपच्या काउंटिंग, परत करण्याची वसई विरारचे पराभूत आमदार हितेंद्र ठाकूर यांची मागणी

  • आदित्य ठाकरेंच्या वाट्याला मोठं यश 

    आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून विजयी. मिलिंद देवरा, संदीप देशपांडेंवर मिळवला विजय. 8 हजार मतांनी आदित्य ठाकरे यांना मिळाला विजय. 

  • वसई विरारमधील धक्कादायक निकाल समोर 

    क्षितीज ठाकुरांमागोमाग वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूरांचा पराभव. 10 हजारहून अधिक मतांनी पराभव 

  • डोंबिवलीतून विजयी निकाल समोर 

    डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण 76802 ने विजय.

     

  • महत्त्वाचे निकाल हाती 

    मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे 95145 मतांनी विजयी. तिथं मलबार हिल मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं मंगलप्रभात लोढासुद्धा विजयी. तर, वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे 13 व्या फेरीअखेर 7440 मतांनी आघाडीवर. 

  •  आदित्य ठाकरे आघाडीवर

    वरळीत आदित्य ठाकरे 12 व्या फेरीअखेर 6120 मतांनी आघाडीवर

     

  • माहिममध्ये अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार 

    माहिम मतदारसंघात महेश सावंत यांच्याकडे 22249 आघाडी. सदा सरवणकर 8136 मतांनी पिछाडीवर. 7 व्या फेरीअखेर मतांची संख्या... 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महेश सावंत 22249 
    सदा सरवणकर 14113
    अमित ठाकरे 9965

    हेसुद्धा वाचा : Mahim Results 2024 Live Updates : माहिममध्ये उलटफेर होणार? अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार

     

  • महायुतीच्या यशस्वी वाटचालीसंदर्भात काय म्हणाले विनोद तावडे? 

    'महाराष्ट्र च्या जनतेने महायुतीला जो प्रचंड विजय दिलाय त्याबद्दल जनतेचे आभार. हा जो विजय झलाय तो मोदींच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार आठवले या सर्वांनी एकत्र काम केलं. विकास कामे, लाडकी बहीण सारख्या योजना यामुळेच जनतेला विश्वास बसला' असं विनोद तावडे म्हणाले. महायुतीला मिळालेल्या यशानंतर त्यांनी काही मुद्दे मांडत मविआसंदर्भात लक्षवेधी वक्तव्य केलं. 'नैसर्गिक युती पवारांनी ठाकरेंनी तोडली तो राग होता. रोज सकाळी राजकारण कलुषित करण्याचं वक्तव्य यायचं त्यामुळे बाळासाहेबांचा शिवसैनिक नाराज होता', असं ते म्हणाले. 

  • मोठी बातमी : कालिदास कोळंबकर यांचा विक्रमी विजय; भरघोस मताधिक्य 

    वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर पुन्हा एकदा विजयी झाले असून, आमदारकीची ही त्यांची नववी कारकिर्द आहे. या विजयासह कोळंबकर यांच्या नावे विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. 25 हजार मतांनी कोळंबकर विजयी. 

  • वरुण सरदेसाई आघाडीवर.... 

    वांद्रे पूर्व मतदारसंघात 9 व्या फेरीनंतर आघाडीवर कोण? 

    झिशान सिद्धीकी -  20324
    तृप्ती सावंत - 10838
    वरूण सरदेसाई - 26018
    वरूण सरदेसाई 5694 मतांनी आघाडीवर

  • चेंबूरमध्ये दोन्ही शिवसेनेत कांटे की टक्कर 

    चेंबूरमध्ये नवव्या फेरीनंतर शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    प्रकाश फातरपेकर 23670
    तुकाराम काते- 26670
    माऊली थोरवे- 3334
    दीपक निकाळजे 5024

     तुकाराम काते 2639 मतांनी आघाडीवर

  • ठाणे शहर विधानसभा दहाव्या फेरीनंतर काय चित्र? 

    मनसे उमेदवार अविनाश जाधव :- 1615
    शिवसेना उमेदवार ठाकरे गट राजन विचारे :-  1856 
    भाजप उमेदवार संजय केळकर :- 4823

    2967 संजय केळकर आघाडीवर
    आता पर्यंत 26916 आघाडीवर संजय केळकर

  • विक्रोळीत अकराव्या फेरीअखेर काय चित्र?  

    सुनील राऊत - 40820
    सुवर्णा करंजे - 30098
    सुनील राऊत यांच्याकडे आघाडी

  • आठवी फेरी कोपरी पाचपाखाडी

    एकनाथ शिंदे (शिंदे सेना) : 5713
    केदार दिघे (उद्धव सेना) : 1682
    मनोज शिंदे (काँग्रेसचे बंडखोर): 15
    नोटा : 115
    एकूण मते : 7593

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    एकनाथ शिंदे : 4031 मतांनी आघाडीवर

    आतापर्यंत शिंदे यांना एकूण मते : 48379

    केदार दिघे यांना एकूण मते : 12629

    एकूण मतांमध्ये शिंदे 35750 इतक्या मतांनी आघाडीवर आहेत

  • वर्सोवा विधानसभा मतदारसंघात कोणाची आघाडी? 

    वर्सोवा विधानसभा मतदारसंघात आठव्या फेरी अखेरीस शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हरून खान यांनी आघाडी घेतली आहे आठव्या फेरीअखेरीस हारून खान यांना 24 हजार 76 मते मिळाली असून त्यांनी घेतलेली आघाडी 1571 मतांची आहे.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भारती लवेकर भाजप 22505 
    हारुण खान 24076

    एकूण मते 55258/ हारून खान यांची आघाडी  1571

     

  • कळवा मुंब्रा 11वी फेरी

    जितेंद्र आव्हाड NCP SP 71704
    नजीब मुल्ला NCP 42093
    सुशांत सूर्यराव मनसे 12930
    जितेंद्र आव्हाड 29611 मतांनी आघाडीवर.

  • मुलुंड - मिहिर कोटेचा 53224 मतांनी आघाडीवर

  • काय सांगतेय वरळी मतदारसंघाती आकडेवारी? 

    आदित्य ठाकरे आठव्या फेरीअखेर 2200 मतांनी आघाडीवर

  • मुंबईतील आघाडीची नवी आणि ताजी आकडेवारी... 

    अनुशक्तीनगर विधानसभा विधानसभा अकरावी फेरी -  

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार - 33642
    सना मलिक  राष्ट्रवादी- 27820
    फहाद अहमद - 5822 मतांनी आघाडीवर

    कळवा मुंब्रा 10वी फेरी

    जितेंद्र आव्हाड NCP SP 62993
    नजीब मुल्ला NCP 40210
    सुशांत सूर्यराव 12854
    जितेंद्र आव्हाड 22783 मतांनी आघाडीवर.

    विक्रोळी दहावी फेरी 

    सुनील राऊत - 37790
    सुवर्णा करंजे - 27172
    सुनील राऊत 10 हजार मतांची आघाडीवर

  • ठाणे शहर विधानसभा आठव्या फेरीअखेर नेमकं काय चित्र? 

    अविनाश जाधव :- मनसे - 1211

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    राजन विचारे :- उद्धव सेना - 1866

    संजय केळकर :- भाजप - 4446

     संजय केळकर 2580 मतांनी आघाडीवर. आतापर्यंत एकूण मतं 20647 

  • वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी 

    सातव्या फेरीअखेर आदित्य ठाकरे 1067 मतांनी आघाडीवर

  • अंबरनाथ नवव्या फेरीअखेर काय चित्र? 

    नववी फेरीअखेर महायुतीचे (शिंदे गट) बालाजी किणीकर 12756 मतांनी आघाडीवर

  • वांद्रे पश्चिम विधानसभा पाचव्या फेरीअंती एकुण मतं 

    वांद्रे पश्चिम विधानसभा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आशिष शेलार - 25,590

    आसिफ झकेरिया - 10,775

    आशिष शेलारांकडे आघाडी -  14,815

  • मंगलप्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल 

    मलबार हिल मधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल . 12व्या फेरीअंती मंगलप्रभात लोढा यांचं मताधिक्य 36 हजारांच्या पार. मंगल प्रभात लोढा यांना 57390 मतं. तर ठाकरे गटाच्या भैरुलाल चौधरी यांना 21028 मतं. 

  • कुर्ला विधानसभेतील तिसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी 

    मंगेश कुडाळकर ( शिंदे शिवसेना ): 14535 
    प्रविणा मोरजकर ( ठाकरे शिवसेना ) : 7023
    स्वप्नील जवळघेकर ( VBA ) : 508
    प्रदीप सावंत ( मनसे )  : 581 
    नोटा : 367

    7512 मतांनी शिंदे यांच्या शिवसेनेचे मंगेश कुडाळकर आघाडीवर

  • कल्याण ग्रामीण आणि नवी मुंबईत काय स्थिती? 

    कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सातव्या फेरीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश मोरे 18000 मतांनी आघाडीवर. तर, नवी मुंबईत सातव्या फेरीअखेर भाजपच्या मंदा म्हात्रे यांना 1100 मतांची आघाडी. इथं सायन कोळीवाडा मतदारसंघात भाजपचे तमिळ सेव्हन यांची आघाडी. सेल्वन यांच्याकडे 8990 मतांची आघाडी. 

  • मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर 

    मतमोजणीच्या आठव्या फेरीनंतर मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर. या जागेवर भाजपकडे 2,2701 मतांची आघाडी. 

     

  • मुंबईतील आघाडी कोणाकडे? 

    भाजपा 16
    शिवसेना शिंदे 7
    राष्ट्रवादी अजित पवार 0
    काँग्रेस 2
    शिवसेना युबिटी 9
    राष्ट्रवादी शरद पवार 0
    मनसे 0
    सपा 2

    महायुती 23
    मविआ 13

  • कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी पाचवी फेरी 

    एकनाथ शिंदे - 5606
    केदार दिघे - 1807
    मतांचा फरक - 3799
    नोटा - 115

    एकूण
    एकनाथ शिंदे - 30629
    केदार दिघे - 7448
    मतांचा फरक - 23181
    नोटा - 484

  • मिहीर कोटेचा मोठ्या मताधिक्याने आघाडीवर 

    मुलुंड मतदारसंघात मिहिर कोटेचा सातव्या फेरी अखेर 30515 मतांनी आघाडीवर

  • वसई विधानसभा नवव्या फेरी अंती काँग्रेसचे विजय पाटील 4482 मतांनी आघाडीवर 

    विजय पाटील (काँग्रेस) - 29057
    हितेंद्र ठाकूर (बविआ) 24575
    स्नेहा दुबे (भाजप) 21555
    नोटा 818

  • एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत- नरेश म्हस्के 

    विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे कल हाती आल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता जवळपास निश्चित झालेली असतानाच आता नरेश म्हस्के यांनी राज्यात 26 तारखेच्या आत सत्ता स्थापन करणार असल्याचं सूचक वक्तव्य करत एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्य़क्त केली. 

  • ऐरोली आणि कल्याणमधून मोठी बातमी... 

    ऐरोली विधानसभेत सातव्या फेरीनंतर भाजप आमदार गणेश नाईक 9852 मतांनी  आघाडीवर. 
    कल्याण ग्रामीण विधानसभा शिवसेना शिंदे गट उमेदवार राजेश मोरे 14000 ने आघाडीवर.

  • भांडुप पश्चिम तिसरी फेरी, रमेश कोरगावकर आघाडीवर

    रमेश कोरगावकर -12472
    अशोक पाटील -10170
    शिरीष सावंत -1858

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मुलुंडमध्ये पाचव्या फेरीअखेर मिहिर कोटेचा 20700 मतांनी आघाडीवर 

    ऐरोली विधानसभा, पाचव्या फेरीनंतर भाजप आमदार गणेश नाईक 4926 मतांनी आघाडीवर

    डोंबिवली विधानसभा मतदारसंघ भाजप उमेदवार रवींद्र चव्हाण 13782 मतांनी आघाडीवर 

  • माहिम मतदारसंघातील दुसऱ्या फेरीनंतरची आकडेवारी 

    महेश सावंत 1657 मतांनी आघाडीवर 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महेश सावंत 5692
    सदा सर्वणकर 4035 
    अमित ठाकरे 3449 

    अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार 

  • मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात नोटा तिसऱ्या क्रमांकावर

    मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्लात नोटा तिसऱ्या क्रमांकावर, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मनोज शिंदे यांना मतदारांनी नाकारले तिसऱ्या फेरीनंतर ही त्यांना दोन अंकी संख्येवर मतं मिळाली. 

  • कुछ तो गडबड है... ; निकालाच्या दिवशी संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया 

    एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महायुतीच्या वाट्याला मिळालेली आघाडी पाहून हा कौल कसा मानावा हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेलाही पडला असेल अशी असंतोषाची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हा जनतेचा कौल नाही, असं मी 100 टक्के सांगतो असं म्हणत त्यांनी निकालाच्या आकड्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या लावून घेतलेल्या निकालांवर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्यांचा विश्वास नाही, असं ते ठणकावून म्हणाले. 

  • ठाणे जिल्हा 18 मतदारसंघ पक्षनिहाय

    134 भिवंडी ग्रामीण – शिवसेना शिंदे गट 
    135 शहापूर अ.ज – राष्ट्रवादी अजित पवार गट
    136 भिवंडी पश्चिम – भाजप
    137 भिवंडी पूर्व – समाजवादी पार्टी 
    138 कल्याण पश्चिम – शिवसेना शिंदे गट 
    139 मुरबाड – भाजप
    140 अंबरनाथ – शिवसेना शिंदे गट
    141 उल्हासनगर – भाजप
    142 कल्याण पूर्व – भाजप
    143 डोंबिवली – भाजप
    144 कल्याण ग्रामीण – शिवसेना शिंदे गट 
    145 मिरा भाईंदर – काँग्रेस
    146ओवळा माजिवडा – शिवसेना शिंदे गट
    147 कोपरी पाचपाखाडी – शिवसेना शिंदे गट 
    148 ठाणे – भाजप
    149 मुंब्रा कळवा – राष्ट्रवादी शरद पवार गट
    150 ऐरोली – भाजप
    151 बेलापूर - भाजप
         
    भाजप - 8 जागांवर आघाडीवर
    शिवसेना शिंदे गट - 6 जागांवर आघाडीवर
    काँग्रेस - 1 जागेवर आघाडीवर
    राष्ट्रवादी शरद पवार गट - 1 जागेवर आघाडीवर 
    राष्ट्रवादी अजित पवार गट - 1 जागेवर आघाडीवर 
    समाजवादी पक्ष - 1 जागेवर आघाडीवर

  • तिसऱ्या आणि चौथ्या फेरीतील कल हाती 

    कलीना विधानसभा पहिली फेरी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    दिलीप मामा लांडे (शिंदे शिव सेना) : 4833
    नसीम खान (कांग्रेस): 3559 
    महेंद्र भानुशाली (मनसे): 327

    विक्रोळी विधानसभा तिसरी  फेरी 

    विश्वजीत ढोलम - 3060
    सुनील राऊत - 11769
    सुवर्णा करंजे - 8977

    मानखुर्द विधानसभा मतदारसंघ चौथी फेरी 

    अबू आझमी समाजवादी पक्ष  13817
    नवाब मलिक 2061
    सुरेश बुलेट पाटील 2995
    अतिक खान 11963

  • हितेंद्र ठाकूर आघाडीवर 

    वसई विधानसभा (चौथ्या फेरीत)

     हितेंद्र ठाकूर (बविआ) 14310
     स्नेहा दुबे-पंडीत (भाजपा) -13649
    विजय पाटील (कॅांग्रेस) - 10,306

  • राज्यात भाजपचं कमळ फुलणार? 

    भाजप महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष. भाजपची 111  जागांवर मुसंडी, शिवसेना 58 जागांवर सरशी. भाजपची 2019 पेक्षा सरस कामगिरी. 

     

  • जोगेश्वरी विधानसभा पाहिली फेरी 

    पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर हाती आलेल्या कलांनुसार जोगेश्वरी विधानसभेत कोण आघाडीवर? 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अनंत बाळा नर - UBT -  2434

    मनीषा वायकर - SS- 5528

    मनीषा वायकर 3094 मतांनी आघाडी वर

  • वरळी विधानसभेत कांटे की टक्कर... 

    वरळी विधानसभा; आदित्य ठाकरे दुसऱ्या फेरी अखेर 696 मतांनी आघाडीवर. आदित्य ठाकरे - 8236, मिलिंद देवरा - 7540, संदीप देशपांडे - 4787 मतं 

  • राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघात काय स्थिती? पहिले कल काय सांगतात? 

    कुलाबा मतदारसंघातून पहिल्या फेरीपासूनच राहुल नार्वेकर 5429 मतांनी आघाडीवर

     

  • ऐरोली विधानसभा, दुसरी फेरी 

    भाजप उमेदवार गणेश नाईक 4491 मतांनी आघाडीवर

  • निवडणूक निकालांनंतर छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वाढणार 

    विधानसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांचा भाव वाढणार असलयाचे बोलले जात असतानाच आताच्या घडीला इतर पक्षाचे डझनभर 12 उमेदवार आघाडीवर आहेत.

  • ठाणे शहर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार 2093 मतांनी आघाडीवर

    संजय केळकर (भाजप) 4336
    अविनाश जाधव (मनसे) 2243
    राजन विचारे (ठाकरे गट) 1917

  • झिशान सिद्दीकी पिछाडीवर, कांदिवली पूर्व मतदारसंघात काय स्थिती? 

    वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे वरून सरदेसाई आघाडीवर. झिशान सिद्दीकी पिछाडीवर. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अतुल भातखळकर 4462 मतांनी आघाडीवर. कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे विश्वनाथ भोईर आघाडीवर. 

     

  • 149 कळवा मुंब्रा मतदार संघातून पहिल्या फेरीत जितेंद्र आव्हाड आघाडीवर 

    पहिली फेरी 
    जितेंद्र आव्हाड 8262
    नजीब मुल्ला 4726
    सुशांत सूर्यराव1696
    नोटा 266

    तर, शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी 356 मतांनी आघाडीवर

  • माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर

    माहिममधून अमित ठाकरे पिछाडीवर, महेश सावंत आघाडीवर. मुंबईतील निकालांकडे सर्वांचं लक्ष 

  • मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काय परिस्थिती? 

    ठाणे कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतमोजणी, पहिली फेरी 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    एकनाथ शिंदे - 5477
    केदार दिघे - 1424

    एकनाथ शिंदे मतांनी 4053 आघाडीवर 

  • वरळीतील पहिल्या फेरीतील निकालाची आकडेवारी 

    पहिली फेरी

    आदित्य ठाकरे - 4169
    मिलिंद देवरा - 3861
    संदीप देशपांडे - 2391

  • भाजपचे कालिदास कोळंबकर 5656 मतांनी आघाडीवर 

    वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळंबकर 5656 मतांनी आघाडीवर. अंधेरी पश्चिम मधून भाजपाचे अमित साटम आघाडीवर. बेलापूर मतदार संघ-  भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे पहिल्या फेरी नंतर 1500 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप नाईक पिछाडीवर. मुंब्रा कळवा मतदारसंघातून एनसीपी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड 3 हजार 790 मतांनी आघाडीवर.

  • मुंबादेवीतून अमीन पटेल आघाडीवर

    मुंबादेवीतून अमीन पटेल आघाडीवर, शायना एनसी पिछाडीवर. तर, मुंबईतील वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर आघाडीवर, श्रद्धा जाधव पिछाडीवर. 

  • शिवडी मतदारसंघातून पहिले कल हाती 

    अतिशय रंजक आणि सुरुवातीपासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या मुंबईतील शिवडी मतदारसंघातून पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, इथं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. तर, तिथं धारावीतून ज्योती गायकवाड आघाडीवर असल्याचं पहिल्या कलांमध्ये पाहायला मिळत आहे. 

  • नालासोपाऱ्यात कोण आघाडीवर? 

    पोस्टल मतदानाच्या मतमोजणीमध्ये  बाविआचे क्षितीज ठाकूर आणि भाजपचे राजन नाईक यांच्यात अटीतटीची लढत सुरू. 

  • मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

    सुरुवातीला टपाली मतमोजणीपासून सुरुवात. एकूण 24 फेऱ्या असून 21 टेबलांवर मतमोजणी होणार आहे. भाजपकडून नरेंद्र मेहता तर महाविकास आघाडीचे मुझफ्फर हुसेन यांच्या तगडी फाईट आहे. या मतमोजणीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

  • ठाण्यातील आणखी एक बहुचर्चित मतदारसंघात तिरंगी लढत 

    ठाणे शहर मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या संजय केळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर मविआकडून राजन विचारे यांच्याकडे उमेदवारी असून, मनसेच्या अविनाथ जाधव यांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल. शहरी आणि उच्चभ्रूंची लोकवस्ती असणाऱ्या या मतदारसंखघात आता तिरंगी लढत पाहायला मिळत असून, इथं बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

  • पोस्टल मतमोजणीत अमित ठाकरे आघाडीवर 

    माहिम मतदारसंघातून पोस्टल मतमोजणीला सुरुवात होताच पहिले कल हाती आले आणि इथं अमित ठाकरे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. 

  • मुंबईतून पहिले कल हाती येण्यास सुरुवात; आदित्य ठाकरे आघाडीवर 

    मुंबईत पोस्टल मतांच्या मतमोजणीपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, इथं कोपरी- पाचपाखाडीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आघाडीवर. तर, वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे आघाडीवर 

  • Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; देवेंद्र फडणवीस, पटोले आघाडीवर

    पोस्टल मतांची मोजणी सुरू, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर

  • वडिलांची अनुपस्थिती मनाला चटका लावणारी- झीशान सिद्दीकी 

    निवडणुकीच्या निकालांचा दिवस असताना आपल्याला वडिलांची कमतरता जाणवत असल्याचं म्हणत त्यांचं नसणं इथून पुढंही जाणवत राहील अशी प्रतिक्रिया मुंबईतील वांद्रे पूर्वचे उमेदवार झीशान सिद्दीकी यांनी दिली. 

  • निकाल हाती येण्याआधी महेश सावंत सिद्धीविनायकाच्या दर्शनाला... 

    विधानसभा निवडणुकीच्या निकालााधी महेश सावंत यांनीसुद्धा सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. यावेळी माहिम मतदारसंघात असणारं सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंचं आव्हान असताना आपल्याला विजयाची खात्री असल्यामुळं मी निर्धास्त आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. हार-जीत ही जीवनातील एक पायरी असते, त्यामुळं आपण आपली दैनंदिन कार्य सुरू ठेवावीत असं सावंत म्हणाले. 

  • ठाणे जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या विधानसभेवर सर्वांचं लक्ष

    गोळीबार नंतर चर्चेत आलेला कल्याण पूर्व विधानसभा, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची कल्याण ग्रामीण विधानसभा, मंत्री रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली विधानसभा आणि सत्ता परिवर्तन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार विश्वनाथ भोईर यांची कल्याण पश्चिम विधानसभा या चारी विधानसभेच्या मतमोजणीला थोड्या वेळात सुरुवात होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे या मतमोजणीनंतरच नेमकं या ठिकाणी कोण निवडून येणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे. 

  • निकालापूर्वी मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात नेतेमंडळींची गर्दी... 

    विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी मुंबईतील मुंबादेवी, वडाळा या आणि अशा इतरही मतदारसंघांतील नेतेमंडळी, उमेदरावारांसह कार्यकर्त्यांनीसुद्धा मुंबईचं आराध्य दैवत असणाऱ्या सिद्धीविनायक मंदिरात भेट देत इथं ही मंडळी गणरायाचरणी नतमस्तक झाली. 

  • मुंबईतील तुल्यबळ लढती कोणत्या? 

    मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही लढती तुल्यबल ठरणार असून, या मतदारसंघांमध्ये कोणाचं वर्चस्व राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कोणत्या आहेत त्या तुल्यबळ लढती? पाहा... 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    वरळी- उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून आदित्य ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून आदित्य ठाकरे यांच्यात लढत आहे. 
    कोपरी पाचपाखाडी- खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मतदारसंघातून उभे असून, इथं त्यांना केदार दिघेंचं आव्हान असेल. 
    माहिम- राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे या मतदारसंघातून मनसेकडून उभे असून, त्यांना शिंदेंच्या शिवसेनेच्या सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेतून महेश सावंत यांचं आव्हान आहे. 
    मुंबादेवी- महायुतीच्या शायना एनसी यांच्यापुढं इथं काँग्रेसच्या अमिन पटेल यांचं आव्हान असेल. 
    अणुशक्ती नगर- नवाब मलिकांची कन्या अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून फाहाद अहमद यांना आव्हान देत आहे. 

     

  • मुंबईतील कोणत्या मतदारसंघांच्या निकालावर असेल मतदारांचं लक्ष? 

    मुंबई शहर क्षेत्रात 10 विधानसभा मतदारसंघ असून, यामध्ये धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा या मतदारसंघांचा समावेश आहे. 

    मुंबई उपनगरीय क्षेत्रांमधील मतदारसंघ पुढीलप्रमाणे- 

    बोरिवली, दहिसर,  मागाठाणे, विक्रोळी, भांडूप पश्चिम, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, कांदिवली पूर्व, चारकोप, मालाड पश्चिम, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्वी, विलेपार्ले, चांदिवली, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, अणुशक्ति नगर, चेंबूर कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम 

  • ठाण्यातील निम्मे निकाल महिलांच्या हाती... 

    विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात पुरुषांच्या एकूण मतदानाचा टक्का 56.79 टक्के इतका असून, महिलांच्या मतदानाचा टक्का 57.11 टक्के असल्याची नोंद करण्यात आली. ठाण्यातील 18 पैकी 9 मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाचा आकडा हा पुरुषांपेक्षा अधिक असल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळं ठाण्यातील यंदाच्या निकालाची सूत्र महिलांच्याच हाती होती असं चित्र स्पष्ट होत आहे. 

     

  • मुंबईतील मतदानाची यंदाची टक्केवारी किती? 

    विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील एकूण मतदानाची टक्केवारी 65.11 टक्के इतकी राहिली. तर,  मुंबई शहरात हा आकडा 52.07 टक्के इतका असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उपनगरातील मतदानाची आकडेवारी 55.77 टक्के इतकी होती. राज्यातील सरासरी मतदानाच्या आकडेवारीच्या तुलनेत मुंबई उपनगरामधील आकडेवारी मोठ्या फरकानं कमी असल्याचं पाहायला मिळालं. 

     

  • मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात 

    मुंबईच्या भांडुप विधानसभा क्षेत्रात आता मतमोजणीच्या तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे सर्व पक्षांचे पोलिंग एजंट हे आता मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभे आहेत पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या मतदारसंघात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. 

  • मुंबईवर कोणाची सत्ता? पहिला अंदाज पाहूनच घ्या... 

    एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मुंबईत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेला चांगलं यश मिळे असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजपचे एकदोन आमदार वगळता इतर सर्व विद्यमान आमदारांना मुंबईत यश मिळेल असं सांगितलं जात आहेच. तर, काँग्रेसच्या वाट्याला 11 पैकी पाच जागा मिळणार असून, आदित्य ठाकरे यांच्या विजयाची जवळ पास निश्चिती मानली जात आहे. तर, अमित ठाकरे यांना मात्र चिवट झुंज द्यावी लागेल असं एकंदर चित्र पाहायला मिळत आहे. 

     

  • निकालापूर्वीच्या बैठकीत शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारांना निर्देश जारी... 

    राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ऑनलाईन बैठकी निकालापूर्वीच उमेदवारांना मार्गदर्शन केलं. बैठकीत विधानसभा क्षेत्रात किती मतदान झालं, हरकती कशा प्रकारे नोंदवायला हव्यात, मतमोजणी संपताना सी17 फॉर्म वरील माहिती काय होती आणि मतमोजणी वेळी आपल्या समोर काय माहिती मांडली जात आहे हे तपासण्याच्या सूचना देण्यात आल्या. सकाळी 9 वाजता ही बैठक पार ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. निकालाचे प्रमाणपत्र घ्या आणि थेट मुंबई गाठा असं या ऑनलाईन बैठकीत उमेदवारांना सांगण्यात आलं. या आदेशांच्या धर्तीवर आता पुढील राजकीय घडामोडींनाही वेग येणार आहे. 

  • मुंबईतील मतमोजणी केंद्रांची संपूर्ण यादी: 

    - वांद्रे पश्चिम : आर. व्ही. टेक्निकल हायस्कूल, खार (प.)
    - भांडूप : सेंट झेवियर्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एल.बी.एस.रोड, कांजूरमार्ग (प.) 
    - वडाळा : महानगरपालिका न्यू बिल्डिंग, भगवान वाल्मीकी चौक, हनुमान मंदिराजवळ, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल.
    - शिवडी : एन. एम. जोशी रोड म्युनिसिपल प्रायमरी मराठी शाळा, एन. एम. जोशी मार्ग, करीरोड (प.). 
    - अंधेरी पूर्व : गावदेवी महापालिका शाळा, मथुरादास रोड, अंधेरी (पू.). 
    - वरळी : महालक्ष्मी स्पोर्ट्स ग्राउंड हॉल, वेस्टर्न रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन, फिनिक्स मॉलसमोर, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी. 
    - मलबार हिल : विल्सन कॉलेज हॉल, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, चर्नीरोड. 
    - चांदिवली : आयटीआय, किरोळरोड, विद्याविहार (प.) 
    - कलिना : मल्टी पर्पज हॉल, मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस, सांताक्रूझ (पू.)
    - चेंबूर : आरसीएफ स्पोर्ट्स क्लब, बॅडमिंटन हॉल, आरसीएफ कॉलनी, आर.सी. मार्ग, चेंबूर.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link