मुंबई : शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जीव्हीके प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. दरम्यान, जीव्हीकेमधील अधिकाऱ्यांची कामगारांसोबत गैरवर्तणूक आणि मनमानी या विरोधात हे आंदोलन आहे. दोन वर्षांपासून वैद्यकीय सोयीसुविधा योजनांपासून कामगारांना वंचित ठेवले जात आहे, असा आरोप कामगारांनी केला आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई आंतर राष्ट्रीय विमानतळ इथे लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जीव्हीके प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात या कामगारांनी संप पुकारला आहे. या काम बंद आंदोलनात चार हजार पेक्षा जास्त कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. यावेळी कामगारांनी जीव्हीके प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या काम बंद आंदोलनाचा परिणाम मुंबई विमानतळावर झालेला पाहायला मिळत आहे.