मुंबई : कोरोनामुळे (Corona) अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेक जणांवर बेरोजगारीची (Unemplyment) कुऱ्हाड कोसळली. काही महिन्यांचा अपवाद वगळता लोकल कोरोना ससंर्गामुळे गेल्या दीड वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून लोकल रेल्वे (Local trains) सर्वसामन्यांसाठीच बंद आहे. पण काही जण नोकरी वाचवण्यासाठी जोखीम पत्कारून लोकलने प्रवास करत आहेत. लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहेत. लोकल मुंबईकरांची लाईफलाईन आहे. लोकल बंद असल्यानेही अनेकांना नोकरी गमवावी लागली. पण आताही अनेक जण कुटुंबियांच्या उदारनिर्वाहासाठी नियम मोडून रेल्वे प्रवास करत आहेत. टीसीने पकडल्यानंतर अनधिकृतरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड भरावा लागतो. लोकल बंद असल्याने सर्वसामन्यांची गैरसोय झालीये. यामुळे होणाऱ्या व्यथ्येला एका मुंबईकर तरुणांना व्हीडिओद्वारे वाचा फोडली आहे.  (Local trains closed to the Common People how to travel video viral on social media) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या तरुणाने व्हीडिओ शूट करुन आपल्या व्यथा मांडल्या आहेत. तसेच त्याने सर्वांना आवाहनही केलंय. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.


व्हीडिओत काय म्हटलंय?


हा व्हीडिओ मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील आहे. या तरुणाला अनधिकृतरित्या प्रवास केल्याने टीसीने पकडलं आहे. टीसी या तरुणाला स्टेशन मास्टरच्या कार्यालयात नेताना या तरुणाने हा व्हीडिओ शूट केला आहे. 



तरुणाचं म्हणनं काय?


"कोरोनामुळे मी गेल्या एक ते दीड वर्षांपासून घरी होतो. नुकताच कामाला लागलोय. माझा आजचा कामाचा दुसराच दिवस आहे. टीसींची काहीच चूकी नाही, ते त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत", असं या तरुणाचं म्हणंन आहे. कर्तव्य बजावणाऱ्या टीसींना त्याने कोणताच दोष दिलेला नाही. या तरुणाने या व्हीडिओच्या माध्यमातून मायबाप सरकारसमोर रेल्वे बंद असल्याने सर्वसामान्यांची होणारी व्यथा मांडली आहे. 


सरकारला जाग केव्हा येणार?


"सर्वसामन्यांच हातावर पोट असतं. ते रोज कमावतात अन रोज खातात, अशांनी लोकल बंद असल्याने काय करावं, काय खावं. सरकारला याबाबतीत केव्हा जाग येणार", असा प्रश्न या तरुणाने सरकारला केला आहे.   


सरकारी कर्मचारी नाहीत हा गुन्हा आहे का? 


"माझ्या बँक खात्यात केवळ 400 रुपये आहेत. मी दरमहा 35 हजार रुपये पगार घ्यायचो. दीड वर्षांपासून बेरोजगार होता. त्यानंतर आता मोठ्या प्रयत्नांनंतर पुन्हा नोकरी मिळाली आहे. या नोकरीच्या दुसऱ्याच दिवशी टीसीनी मला पकडलं. रेल्वे तिकीट किंवा पास मिळत नाहीत. आम्ही काही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?" असा उद्विघ्न सवाल या तरुणाने सरकारला केला आहे.


गरिब मुलांनी काय करायचं? 


"आमच्याकडे आज पैसे नाहीयेत. पण सरकार दंडाच्या माध्यमातून आम्हाला लुबाडत असेल, तर आम्ही गरिब मुलांनी काय करायचं", असा प्रश्न तरुणाने केला आहे. "दीड वर्ष बेरोजगार राहिल्यानंतरही आमच्या मनात आत्महत्येचा विचार येत नाही. घरच्यांचा दबावही सहन करावा लागतोय", असं युवकांने नमूद केलं. 


"लोकलमधून अजूनही कितीतरी जण प्रवास करतात. प्रत्येकाला पकडणार, त्याच्यावर कारवाई करणार, यापेक्षा सरकारने सर्वांसाठी लोकल सुरु करावी. तुम्ही का कोव्हिड कोव्हिड करताय? अनेक जण लोकलने धक्काबूक्कीने प्रवास करुन येत आहेत. नेमका प्रॉब्लेम काय आहे? बास्स झालं आता लॉकडाऊन, कोव्हिड कोव्हिड. लोकं अशी जगतील किंवा तशी मरतील. किमान इतकं तरी करा", अशी उद्विघनता या तरुणाने व्हीडिओद्वारे मांडली आहे. तसेच हा व्हीडिओ शेअर करा, असं आवाहनही त्याने केलंय.


संबंधित बातम्या : 


'हा' पास असेल तरच लोकल प्रवासाची मुभा, ठाकरे सरकारचा नवा निर्णय


राज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?