`काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, सेना आली तर चांगलेच अन्यथा आपण समर्थ`
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना धीर दिला.
मुंबई : शिवसेने युतीसाठी एक पाऊल पुढे टाकले. त्याचवेळी तीन राज्यातील पराभवानंतर शिवसेनेचं भाजपवर दबावतंत्राचा वापर केला. मात्र, भाजपने या दबावाला फारसे महत्व दिलेले नाही, हे आजच्या भाजपच्या आमदार, खासदार बैठकीवरुन दिसून आलेय. काँग्रेसच्या विजयाने खचून जाऊ नका, शिवसेना सोबत आली तर चांगलेच आहे. अन्यथा आपण स्वतंत्र निवडणूक लढण्यास समर्थ आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेय.
तीन राज्यातील पराभवानंतर शिवसेनेने भाजपवर दबावतंत्राचा वापर केला. लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्याबरोबर विधानसभेत १५५ जागांची मागणी केली. मात्र भाजप १३८ जागा देण्यास तयार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानवर भाजप नेत्यांची पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांबरोबर खलबते सुरु होती. शिवसेनेला सोबत घेण्याचा विचार होता. ते जर आमच्यासोबत आलेत तर चांगले. भाजपच्या बाजूने सकारात्मक चर्चा आहे. मात्र, ते नाही आलेत तर आपण समर्थ आहोत, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर दिलाय. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागलेय.
शिवसेना - भाजप युतीबाबत प्रस्ताव, 'या' मागण्या मान्य झाल्या तर युती!
भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कालच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातल्या सर्व भाजप खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष आणि मुख्य पदाधिकाऱ्यांची वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी भाजप नेत्यांना धीर दिला. काँग्रेसचा विजय झाला तरी तुम्ही खचून जाऊ नका. आपण समर्थ आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.
शिवसेना एकटी लढली तरी आपण एकटे निवडणूक लढण्यास समर्थ आहोत, काँग्रेसच्या विजयाने तुम्ही खचून जाऊ नका, असं मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना सांगितले आहे. वर्षावरच्या महाबैठकीत आज खलबतं झाली. राज्यात नंबर वन भाजप आहे. शिवसेना एकटी लढली तरी आपण समर्थ आहोत. शिवसेना सोबत आली तर वेल अँड गुड. भाजपच्या बाजूने सकारात्मक चर्चा आहे. मीडियाच्या बातम्या एकूण चर्चा करू नका. मिशन मोडमध्ये आपल्याला जायचं आहे, पक्षाचा हाच रॉडमॅप अध्यक्ष यांनी ठरवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले.