राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर, बीडमध्ये पंकजा मुंडेंना आव्हान
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दोन नावांचा समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत.
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची (NCP Sharad Pawar Group) दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात दोन नावांचा समावेश आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी शरद पवार गटाने एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत बीडमधून बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांना तर भिंवडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे (Suresh Mhatre) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बीडमध्ये महायुतीच्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीच्या शरद सोनावणे यांच्यात लढत होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे हे दोघेजण इच्छूक होते. ज्योती मेटे यांनी दोनच दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. पण बजरंग सोनावणे यांनी गेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना चांगली टक्कर दिली होती. त्यामुळे शरद पवार गटाने बजरंग सोनावणे यांच्या नावाची घोषणा केली आहे.
तर भिंवडीत भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना कडवी टक्कर शरद पवार यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भिंवडीत आता कपिल पाटील आणि बाळ्यामामा यांच्या थेट लढत होईल.
शरद पवार गटाची पहिली यादी
याआधी शरद पवार गटाच्या पहिल्या यादीत पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली होती. यात वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगर लोकसभा मतदार संघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
बारामतीत नणंद-भावजय
बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा नणंद-भावजयचा लढत पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर, खडकवासला, बारामती, इंदापूर, दौंड, भोर वेल्हा असे विधानसभा मतदारसंघ येतात. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे 2, काँग्रेसचे 2 तर भाजपचे 2 आमदार आहेत.
शिरुरमध्ये तगडी चुरस
शिरुरमध्ये प्रचारात इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पावरुन आढळरावांनी कोल्हेंच्या प्रकल्पाची खिल्ली उडवली. त्यावरुन दोघांमध्ये चांगलंच शीतयुद्ध रंगलंय. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प म्हणजे कोल्हेंनी जनतेला दाखवलेलं चंदेरी दुनियेतलं स्वप्न असल्याची टीका आढळरावांनी केली. तर स्वत:ला काही करता आलं नाही, मात्र, प्रकल्पाला पाठिंबा देण्याऐवजी पोटात मळमळतंय. त्यांच्यासाठी गेट वेल सून असं म्हणत कोल्हेंनी आढळरावांना प्रत्युत्तर दिलं...
आदित्य ठाकरेंची टीका
गद्दारांना अजूनही उमेदवारी मिळालेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी काय होईल याचा 40 गद्दारांनी विचार करावा असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. मविआचे उमेदवार जाहीर झाले तरी महायुतीला उमदेवार मिळत नाहीत.. यावरुनही आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केलीये.