लोकसभा निवडणूक २०१९ : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील `रणसंग्राम`
लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्यात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईमधून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या सहा जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपने अखेर मनोज कोटक यांना उमेदवारी दिलेली आहे. मनोज कोटक यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांच्याशी होणार आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये किरीट सोमय्या यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. पण मुंबई महापालिका निवडणुकीवेळी किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे शिवसेनेनं या मतदारसंघात किरीट सोमय्या यांना तिकीट द्यायला विरोध केला होता.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातून भाजपच्या किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दीना पाटील यांचा ३,१७,१२२ मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
किरीट सोमय्या | भाजप | ५,२५,२८५ |
संजय दीना पाटील | राष्ट्रवादी काँग्रेस | २,०८,१६३ |
मेधा पाटकर | आप | ७६,४५१ |
मच्छिंद्र चाटे | बसपा | १७,४२७ |
अविनाश डोळस | भारिप बहुजन महासंघ | ८,८३३ |