प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीची पहिली यादी जाहीर
काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : काँग्रेसकडून जागावाटपावर तोडगा न निघाल्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीची पहिली लोकसभा निवडणुकीची ३७ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. वंचित आघाडीकडून ४८ पैकी ३७ उमेदवारीची यादी जाहीर झाली. बाकीचे जागेवरील उमेदवार तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. धनगर समाज ६ जण आहेत. नागपूरसारखी औरंगाबादला मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप होऊ नये, याची काळजी काँग्रेसने घ्यावी, असा टोला काँग्रेसला लगवण्यात आला आहे. जवळपास २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. नवबौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार आणि विश्वकर्मा या समाजातील प्रत्येकी एका उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली आहे.
आंबेडकर यांनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे १२ जागांची मागणी केली होती. मात्र, अद्याप दोन्ही काँग्रेस आघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. अजुनही जागा वाटपात चढाओढ दिसून येत आहे. अहमदनगरची जागा काँग्रेला सोडण्याची मागणी होत होती. तसा दबाव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीवर सुजय विखे यांनी आणला. मात्र, राष्ट्रवादीकडून ही जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी ही अहमदनगरमधून मिळेल, तसा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जागा वाटपाचा तिढा दिसून येत आहे. दरम्यान, प्रकाश आंबडेकर यांनी बारा जागांची मागणी केल्याने त्यांची मागणी कशी पूर्ण करणार हे दोन्ही काँग्रेसपुढे आव्हान होते. त्यामुळे आंबेडकर यांना काँग्रेसकडून उत्तर दिले गेले नाही. वाट पाहून अखेर आज त्यांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढविण्याचा निर्धार प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
३७ उमेदवारांची यादी
वर्धा - धनराज वंजारी
रामटेक - किरण रोडगे - पाटनकर
भंडारा - गोदीया :- एन के नान्हे
चंद्रपूर :- राजेंद्र महाडोळे
गडचिरोली :- रमेश गजबे
यवतमाळ :- प्रवीण पवार
बुलढाणा :- बळीराम सिरस्कार
अमरावती :- गुणवंत देवपारे
हिंगोली :- मोहन राठोड
नांदेड :- यशपाल भिंगे
परभणी :- आलमगीर खान
बीड :- विष्णू जाधव
उस्मानाबाद :- अर्जुन सलगर
लातूर :- राम गारकर
जळगाव :- अंजली बाविस्कर
रावेर :- नितीन कंडोलकर
जालना :- शरदचंद्र वानखेडे
रायगड :- सुमन कोळी
पुणे :- अनिल जाधव
बारामती :- नवनाथ पडळकर
माढा :- विजय मोरे
सांगली :- जयसिंग शेंडगे
सातारा :- सहदेव एवळे
रत्नागिरी - सिधुदुर्ग :- मारुती जोशी
कोल्हापूर :- अरुणा माळी
हातकणंगले :- अस्लम सययद
नंदुरबार :- दाजमल मोरे
दिंडोरी :- बापू बंडे
नाशिक :- पवन पवार
पालघर :- सुरेश पडवी
भिवंडी :- ए डी सावंत
ठाणे :- मल्लिकार्जुन पुजारी
मुबंई साउथ दक्षिण :- अनिल कुमार
मुबंई साउथ दक्षिण मध्य :- संजय भोसले
ईशान्य मुबंई :- संभाजी काशीद
मावळ :- राजाराम पाटील
शिर्डी :- अरुण साबळे