Loksabha Election 2024 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Zee 24तास शी संवाद साधताना दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान बऱ्याच गोष्टींबाबतच स्पष्टोक्ती केली. राजकीय आरोप प्रत्यारोप आणि मतमतांतरांसंदर्भात त्यांनी पक्षाची बाजू मांडताना शिवसेना आणि भाजपमध्ये नेमका दुरावा कुठं आला आणि तो दुरावा वाढण्यामागची नेमकी कारणं काय, यासंदर्भातील अनेक खुलासे केले. पडद्यामागं नेमकं काय घडत होतं, यावर फडणवीसांनी उजेड टाकला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या मैत्रीनंतर आता सुरु असणारा विरोधाचा काळ  पाहता राजकीय शत्रुत्वासंदर्भातील प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलं. त्यांच्या याच वक्तव्यातून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा कधीच एकमत का झालं नाही, याबाबतची सखोल माहिती मिळाली. हे मतभेद नसून हे मनभेद असल्याचं म्हणत किमान शब्दांत फडणवीसांनी परिस्थितीचा कमाल आढावा मांडला. 


उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस? 


'तुमची आणि माझी राजकीय मतं वेगळी असू शकतात... तुम्हाला खुर्ची हवी होती, तुम्ही (काँग्रेस, राष्ट्रवादीशी) तडजोड केली सर्व ठिक आहे. पण, माझी माफक अपेक्षा इतकीच होती की मी तुमच्याशी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो.  पाच वर्ष तुमच्यासोबत जो मुख्यमंत्री राहिलाय, पाच वर्ष ज्या व्यक्तीनं तुमचा शब्द अर्ध्या रात्रीही खाली पडू दिला नाही, पाच वर्ष ज्या व्यक्तीनं स्वतच्या पक्षासारखं सांभाळलं किमान इतकं सौजन्य दाखवा की त्या व्यक्तीचा फोन उचलून नाही, देवेंद्र आमचं काहीतरी वेगळं ठरलंय हे तुम्ही सांगू शकता.' 



हेसुद्धा वाचा : शिंदेंच्या बंडानंतर काय घडलं? देवेंद्र फडणवीस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट


 


'तुम्ही फोनही घेणार नाही ही, अवस्था असेल तर हा स्वार्थ नाही तर आणखी काय? हे मतभेद नाही मनभेद आहेत. तुम्ही आज जे शब्द वापरता ते, एखाद्या पक्षाच्या प्रमुखाला हे शोभतं का?', असं म्हणताना उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यांवर फडणवीसांनी टीका केली. 'मला त्यांच्याहून घाणेरडे शब्द वापरता येतात, मी नागपुरचा आहे! मी त्यापेक्षा भयानक भाषा वापरू शकतो. पण, मला ते शोभत नाही. मी पक्षाचा प्रमुख आहे. पण त्यांना काही मला काही फरक पडत नाही रोज लोक त्यांच्यावर हसतात', असं म्हणत त्यांनी आपण आजही एखाद्या प्रसंगी समोरासमोर आलो तर नमस्कार चमत्कार होतो. पण, इद्धव ठाकरेंदा 'इगो' इतका मोठा आहे की इच्छा असतानाही ते संपर्क साधतील असं वाटत नाही ही वस्तुस्थितीसुद्धा थेटच मांडली.  


उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि... 


'एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या च्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री करण्याची ऑफर दिली होती', असा सनसनाटी गौप्यस्फोट फडणवीसांनी केला. 2024 ला सत्तास्थापनेच्या वेळी उद्धव ठाकरेंनी फोन केला. तुम्ही मुख्यमंत्री बना, असं त्यांनी सांगितलं. मात्र वेळ निघून गेली होती, असं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं.