स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर आज देश...` शिवाजी पार्कच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Narendra Modi Shivaji Park Sabha: या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसत आहेत.
Narendra Modi Shivaji Park Sabha: मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पार पडतेय. मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसत आहेत. महाराष्ट्रात पाचव्या आणि अंतिम टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात येत्या 20 मे रोजी मतदान होणार आहे. यासाठीच्या प्रचाराची सांगता आज मोदींच्या सभेनं होतेय. या सभेत राज ठाकरेंचंही भाषणही झाले. राज ठाकरेंनी आतापर्यंत महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन प्रचारसभा घेतल्यायत. आजच्या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित आहेत.
समस्त मुंबईकरांना माझा राम राम..कसे आहात तुम्ही? असे मराठीतून म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुंबई हे शहर केवळ स्पप्न पाहत नाही. मुंबई स्वप्न जगते. स्वप्न घेऊन चालणाऱ्यांना मुंबईने कधी निराश केलं नाही. 2027 चं स्वप्न घेऊन आलोय. देशाचं एक स्वप्न आहे. आपल्या सर्वांना मिळून विकसित भारत बनवायचाय. यात मुंबईची भूमिका मोठी आहे. वेगाचे महत्व मुंबईकरांना जास्त माहिती आहे.
भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश पुढे निघून गेलेय. आपल्यात काही कमी होतं का? भारतीयांच्या स्वप्नांवर विश्वास न ठेवणाऱ्या सरकारमध्ये कमी होती. लाल किल्ल्ल्याच्या भाषणातून त्यावेळचे पंतप्रधान आळशी म्हणून संबोधायचे. ज्यांचे विचार असे असतील ते देशाला पुढे नेऊ शकत नाही. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसवर बंदी आणली असती तर देश 5 दशके पुढे असता.
काही वर्षात मी तुमच्यासमोर येईन तेव्हा देश जगातील तिसरी आर्थिक व्यवस्था बनलेली असेल. मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाणार आहे. 10 वर्षात भारता रेकॉर्डब्रेक गुंतवणूक होईल, असेही ते म्हणाले.
कलम 370 हटेल हे अशक्य वाटत होतं. पण ती भिंत मी गाडली आहे. जगातील कोणतीच ताकद पुन्हा 370 आणू शकत नाही. राम मंदिर उभारणीसाठी आपण 500 वर्षे लढा दिला.
जनादेश नाकारुन यांनी सरकार बनवले तेव्हा त्यांनी मेट्रो सारखे प्रकल्प लटकवले. मोदी मुंबईला तिचे हक्क देण्यासाठी आलाय, असे ते म्हणाले. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईत चालेल, तो दिवसदेखील दूर नाही, असे ते म्हणाले.
एनडीए रोजगाराच्या नव्या संधी देत आहेत. भारतात गेल्या 10 वर्षात सव्वा लाखाहून अधिक स्टार्टअप बनले आहेत. भारत मोबाईल मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये देशातील दुसरा देश बनेल, असे मोदी म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
तीन टप्प्यात मी बोलणार आहे. पहिला टप्पा मोदी यांची पहिली पाच वर्षे..यानंतर गेली 5 वर्षे..उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर बोलण्यावर वेळ घालवला. ते निवडून येणारच नाहीत. त्यांच्यावर का बोलायच? असा प्रश्न त्यांनी विचारला.
नरेंद्र मोदी होते म्हणून राम मंदिर बनू शकलं. अन्यथा ते झालंच नसतं. पुढच्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये मराठा साम्राज्याचा इतिहास मुलांना लहानपणापासून शिकवला जावा. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती स्थापन करावी. गेल्या 18-19 वर्षे मुंबई-गोवा महामार्ग रखडलाय, तो पूर्ण करावा. देशविघातक मुस्लिमांपासून देश कायमचा सुरक्षित करा. मुंबईच्या सर्व रेल्वे यंत्रणेसाठी केंद्राने जास्तीत जास्त पैसे द्यावे.