Sharad Pawar Group First list : उद्धव ठाकरेची शिवसेनाची पहिली यादी आज जाहीर करणार होते. मात्र सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील उमेदवारावरुन वाद सुरु असताना शरद पवार गटातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी ही गुरुवारी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर 28 मार्चला जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढणार, असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. (Lok Sabha Election 2024 ncp sharad pawar group First list of candidates on March 28 big news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या बारामती, माढा, शिरुर, सातारा, बीड, वर्धा, रावेर, अहमदनगर, भिवंडीसह दहा जागांवर लढवणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या बारामती, माढा, शिरुर, सातारा, बीड, वर्धा, रावेर, अहमदनगर, भिवंडीसह दहा जागांवर लढवणार असल्याचं जयंत पाटलांनी सांगितलंय. पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बुधवार हा शेवटचा दिवस आहे. तरी इकडे महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची राष्ट्रवादी  आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे आपले उमेदवारांची यादी जाहीर करणार आहेत. 


मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत बुधवारी दुपारी 3 वाजता एकत्रितरित्या पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा करणार आहे. त्यामुळे कोणाला कुठून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागंलय. दुसरीकडे सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतील जागेचा तिढा कायम आहे. यावर काय तोडगा निघणार हे वेळच सांगेल. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या दुपारी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषद घेणार आहे असं सांगितलं जातंय. यटा बैठकीत ते परत एकदा नावांवर चर्चा करुन यादीवर शिक्कामोर्तब करणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. 


 


शिवसेनेचे संभाव्य उमेदवार


1)    दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2)    दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
3)    उत्तर पूर्व मुंबई – संजय पाटील
4)    उत्तर पश्चि मुंबई – अमोल किर्तीकर
5)    उत्तर मुंबई – तेजस्वी घोसाळकर / विनोद घोसाळकर
6)    ठाणे – राजन विचारे
7)    कल्याण – केदार दिघे
8)    पालघर – भारती कामडी किंवा सुधीर ओझरे
9)    रायगड -  अनंत गिते
10)    रत्नागिरी – सिंधुदुर्ग – विनायक राऊत
11)    मावळ – संजोग वाघिरे पाटील
12)    सांगली – चंद्रहार पाटील
13)    नाशिक – विजय करंजकर 
14)    संभाजीनगर – चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे
15)    परभणी – संजय जाधव
16)    हिंगोली – नागेश आष्टीकर
17)    धाराशिव – ओमप्रकाश राजेनिंबाळकर
18)    बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
19)    यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
20)    शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
21)    जळगाव – ललिता पाटील किंवा हर्षल माने
22)    हातकणंगले – राजू शेट्टींना पाठिंबा