Sanjay Raut News : देशात पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha election 2024) धर्तीवर अवघ्या काही तासांमध्येच निकालांचा पहिला अंदाज अर्थात एक्झिट पोल समोर येणार आहेत. या एक्झिट पोलमध्ये कोणताही फेरफार नसेल असा विश्वास व्यक्त करत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीलाच विजय मिळणार असल्याचा विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधानांच्या ध्यानसाधनेवर निशाणा साधत ध्यान करण्यच्या ठिकाणी इतक्या कॅमेऱ्यांची गरज का? असा खडा सवाल केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे ध्यानसाधनेत व्यग्र असल्याचं पाहता हा सक्व दिखावा असल्याची बोचरी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. 


'ध्यानधारणेच्या ठिकाणी 27 कॅमेरे लागले आहेत. ध्यानस्थ असणारा माणून कॅमेराकडे बघत नाही आणि सगळ्या अँगलनं टीव्हीसमोर येत नाही. इथं मात्र ते कॅमेरे त्यांचे शिष्यच वाटत आहेत', असा टोला राऊतांनी लगावत, 'चारही बाजुंनी कॅमेरा लावून एक माणूस ध्यानसाधना करतोय हा तर आमच्या योगसाधनेचा अपमान', अशा सुरात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 


हेसुद्धा वाचा : पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल


 


'ही ध्यानघारणा नसून एक प्रकारचा दिखावा आहे, कारण इथं 27 कॅमेरे आहेत. ज्यामुळं तुम्ही प्रत्येक अँगलनं पंतप्रधानांना पाहू शकता. अगदी केसापासून पायाच्या नखापकर्यंत सर्वकाही या कॅमेरातून दिसेल. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, तपस्वी ध्यान करायचे तेव्हा असे कॅमेरा नव्हते. किंबहुना त्यांच्या आजुबाजूलाही कोणी नव्हतं. आता पाहा, 3 हजार सुरक्षा रक्षत आहेत, ध्यानधारणा असणारा भाग पर्यटकांसाठी बंद आहे... इथं फक्त लक्ष केंद्रीत केलं जात आहे', असं म्हणत राऊतांनी पुन्हा एकदा या पंतप्रधानांच्या ध्यानधारणेवर टीकेची झोड उठवली. 


4 जूननंतर देशात राजकारणाचं चक्र उलट फिरणार 


जर इंडिया आघाडी जिंकली तर.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर इंडिया आघाडीच्या विजयासंबंधीच्या प्रश्नावर उत्तर देताना, जर तरच्या चर्चा दूर सारत इंडिया आघाडीच जिंकणार असल्याचा विश्वास संजय राऊतांनी बोलून दाखवला. '4 जूनला 12 वाजल्यानंतर तुम्हाला इंडिया आघाडी विजयी झाल्याचं कळेल आणि देशाचा पंतप्रधानही इंडिया आघाडीचाच असेल', या वक्तव्यावर त्यांनी जोर दिला. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले त्याप्रमाणं पंतप्रधानपदासाठी त्यांची पसंती राहुल गांधी यांना आहे असं सांगताना देशाची पसंतीही राहुल गांधी यांनाच आहे, हे वक्तव्य अधोरेकिथ करत राहुल गांधी यांना आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.