LokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटरही दिसत आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला असून, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी 1801 अंकांनी घसरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या विजयाचे आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याचे अंदाज वर्तवण्यात होते. मात्र जे कल हाती आले आहेत त्यानुसार एनडीएला जास्तीत जास्त 290 पर्यंत जागा मिळतील असं दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदार निरुत्साही झाल्याचं चित्र आहे. सकाळी शेअर मार्केट सुरु झाल्यानंतही घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्समध्ये जवळपास 1257 अंकांची घसरण झाली होती. तर निफ्टीमध्ये 192 अंकांची घसरण झाली होती.


गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी बुडाले


सोमवारी शेअर मार्केट सेन्सेक्समध्ये 2500 अंक आणि निफ्टीत 733 अंकांची वाढ होऊन बंद झालं होतं. पण आज त्याच्या दुप्पट वेगाने दोन्हीकडे घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. BSE Mcap नुसार गुंतवणूकदारांचे 30 लाख कोटी बुडाले आहेत.