महाराष्ट्रात पवार, ठाकरे, फडणवीस, शिंदे, पटोलेंची प्रतिष्ठा पणाला... नेत्यांचं ठरणार भवितव्य
Loksabha Result Maharashtra : लोकसभा निवडणुकीचे निकाल आता अवघ्या काही मिनिटांवप येऊन ठेपलेत. मोदी विजयाची हॅटट्रिक करणार की इंडिया आघाडी मोदींचा विजयरथ रोखणार, हे पाहणं महत्त्वाचंय. महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असणारे याचीही सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे.
Maharashtra Election Results LIVE : आजच्या दिवसाकडे तमाम देशवासियांचं लक्ष लागून राहिलंय.. कारण आज लागणार आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल... देशात सत्तापरिवर्तन होणार... महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे.. मात्र अगदी काही तासात याचं उत्तर मिळणार आहे... देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत...
पुढची 5 वर्ष केंद्रात कोणाचं सरकार येणार याचा फैसला आज होणार आहे... तर महाराष्ट्रातही महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाची सरशी होणार याचाही निकाल आजच लागणार आहे... 2014 मध्ये भाजप स्वबळावर सत्तेत आलं होतं.. यंदाही भाजपने 400 पारचा नारा दिलाय... तेव्हा भाजपचा हा नारा पूर्ण होणार की इंडिया आघाडी भाजपला रोखत आघाडी सरकार स्थापन करणार... देशातील जनतेनं कुणाला कौल दिलाय. हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होणार आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई रंगली.. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक होतेय..
शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचंय. याशिवाय महायुतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येणार का, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्यात. तेव्हा मतदारांच्या मनात काय आहे.. लोकांचा कौल कुणाला मिळणार आहे हे आजच्या लोकसभा निवडणुकीतून कळणार आहे... आता प्रतिक्षा आहे महानिकालाची...