राज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा
राज्य शासनाच्या सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ साठीच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : राज्य शासनाच्या सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ साठीच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
यात नाशिकचे महाजन बंधू यांना २०१६-१७ साठी साहसी क्रीडा प्रकारात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय तर नाशिकचे कविता राऊत हिचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना २०१६-१७ साठी उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार जाहीर झालाय.
राज्य शासनाकडून एकूण १९५ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारीला गेट ऑफ इंडियाला राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार आहे. बिभीषन पाटील, अरुण दातार आणि रमेश तावडे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाले आहेत.